नवी दिल्लीः गुगलनं अलीकडेच प्ले स्टोरवरील काही धोकादायक अॅप्स डिलीट केल्यानंतर आता शाओमीचं क्विक अॅप्ससुद्धा प्ले स्टोरमधुन हटवण्यात आलं आहे. युजर्सच्या डेटा सेफ्टीचं कारणं देत गुगलनं ही कारवाई केली आहे. गुगलनं अॅप हटवण्यापूर्वी ट्विटर आणि रेडिटवर क्विक अॅप ब्लॉक केल्याची तक्रार काही युजर्सनी केली होती. क्विक अॅप अपडेट करण्याचा प्रयत्न करताना या अॅपच्या माध्यमातून तुमचा डेटा गोळा करण्यात येत आहे आणि तुम्हाला ट्रॅक करण्यासाठी याचा वापर होत असल्याचा एक मेसेज युजर्सना येत होता. क्वीक अॅपचं नवीन अपडेट आल्यानंतर म्हणजेच १४ नोव्हेंबरला गुगलनं अॅप ब्लॉक केलं आहे. गुगलनं ब्लॉक केल्यानंतर एक रिपोर्ट समोर आला आहे. यारिपोर्टनुसार, शाओमीचं क्विक अॅप्स स्मार्टफोनमधील ५५ सिस्टिम लेव्हल परमिशन अॅक्सेस करत होते. शाओमीचं हे अॅप युजर्सच्या डिव्हाइसमध्ये अनरजिस्टर अॅप इन्सॉल करत होतं. हे अॅप 'आयएमईआय', 'आयएमएसआय', 'एसआयएल'नंबर चोरी करत असल्याचं समोर आलं आहे. तसंच, ऑडिओ, व्हिडिओ कॉल्सही रेकॉर्ड केले जात होते. डेटा थोड्यावेळासाठी सिस्टिममध्ये स्टोर केल्यानंतर काही वेळानंतर अॅनलिटिकल डॅशबोर्ड तयार करण्यासाठी सर्व्हरवर पाठवण्यात येत होता. यामुळंचं युजर्सच्या लॉक स्क्रीन आणि दुसऱ्या ब्राउजर्सवर जाहिराती येत होत्या.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/35dZGnb
Comments
Post a Comment