नवी दिल्ली : कडून आयफोन ११ सीरिजसाठी डिव्हाइसेस लाँच करण्यात आले असून यामध्ये स्मार्ट बॅटरी केसचाही समावेश आहे. iPhone 11, आणि साठी हे डिव्हाइसेस लाँच करण्यात आले आहेत. फोन अनलॉक न करताच कॅमेरा ओपन करण्यासाठी एक स्पेशल बटण देण्यात आलं आहे. फुल चार्जिंग झाल्यानंतर या बॅटरी केसमुळे ५० टक्के जास्त बॅटरी बॅकअप मिळेल, असा कंपनीचा दावा आहे. नवीन स्मार्टफोन केस विविध कलर्समध्ये लाँच करण्यात आली आहे. हे डिव्हाइसेस सध्या फक्त अमेरिकेतच उपलब्ध आहेत. iPhone 11, Pro आणि iPhone 11 Pro Max स्मार्ट बॅटरी केसची किंमत १२९ डॉलर म्हणजेच जवळपास ९ हजार २०० रुपये असेल. ही स्मार्ट केस ब्लॅक, व्हाइट आणि पिंक सँड या कलर्समध्ये मिळेल. यूएस वेबसाइटवर ही केस खरेदी केली जाऊ शकते. एका दिवसापेक्षाही कमी वेळेत या केसची डिलिव्हरी केली जाईल, असा दावा कंपनीने केला आहे. या केसमध्ये क्यूआय स्टँडर्ड कम्पॅटिबिलीटी वायरलेस चार्जिंग फीचरही आहे. या आयफोन बॅटरी केसची डिझाईनही आकर्षक आहे. यामध्ये सॉफ्ट मायक्रोफायबर लायनिंगचा वापर केला आहे. तर बाहेरच्या बाजूने सिलीकॉम एक्सटिरीयर आहे. हिंज डिझाईनमुळे केस लावणं आणि काढणं आणखी सोपं होतं. iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max कव्हरमध्ये देण्यात आलेलं कॅमेरा बटणही पॉवर बटणच्याच बाजूने देण्यात आलं आहे. कॅमेरा बटणमुळे फोन अनलॉक असतानाही कॅमेराचा वापर करता येईल. शिवाय क्विक प्रेसच्या माध्यमातून फोटो क्लिक होईल. लाँग प्रेसमुळे व्हिडीओही रेकॉर्ड करता येईल. Apple च्या नव्या बॅटरी केसची बॅटरी किती शिल्लक आहे ते नोटिफिकेशन सेंटरमध्ये दिसेल. युझर्स आयफोन आणि स्मार्ट केस एकाच वेळी चार्ज करू शकतात.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Ox9T7D
Comments
Post a Comment