नवी दिल्लीः 'गुगल पे' आणि 'अॅपल'नंतर फेसबुकनंही पैसै भरण्यासाठी नवी सिस्टीम '' लाँच केली आहे. अमेरिकेत गेल्या आठवड्यापासून ' पे' सुरू झालं. लवकरच ही सिस्टीम भारतातही येणार आहे. 'फेसबुक पे'च्या माध्यमातून युजर्सना व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्रामवर पेमेंट करणं सोप जाणार आहे. >>'फेसबुक पे' कसं वापरणार? >>'फेसबुक पे' वापरण्यासाठी अगदी काही सोप्या टिप्स आहेत. >>'फेसबुक अॅप'मधील सेटिंगमध्ये जा >>'फेसबुक पे'चा पर्याय निवडा >>कोणत्या पद्धतीनं पेमेंट करणार आहेत हे निवडा >>फेसबुक सर्वकंपन्यांच्या डेबिट कार्ड व क्रेडिट कार्ड उपलब्ध असून इतरही काही पेमेंट प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. ऑथेंटिकेशनसाठी युजर्सना पिन किंवा डिव्हाइस बायोमॅट्रिकला जोडणं गरजेचं आहे. अनेक युजर्स बायोमॅट्रिकबाबत साशंक असतात. पण फेसबुक कोणत्याही प्रकारे युजर्सची माहिती स्टोअर करत नसल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. त्याचबरोबर फेसबुक अकाउंटसोबत होणारे गैरव्यवहार रोखण्यात येणार आहेत. युजरच्या अकाउंटची हिस्ट्री फेसबुक पेवर दिसणार आहेत.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/34bdRJX
Comments
Post a Comment