'गुगल पे'द्वारे बँक खात्यातून चोरले एक लाख रुपये

नवी दिल्लीः ऑनलाइन खरेदीसाठी अॅप मोठ्या प्रमाणात वापरण्यात येते. गुगल पेच्या माध्यमातून फसवणूकीचे प्रकारही वाढले आहेत. नोएडा येथे राहणाख्या महिलेला गुगल पेच्या माध्यमातून फक्त तीन मिनिटांत एक लाख रुपयांचा गंडा घातला आहे. गुगल सर्चमध्ये होता फेक नंबर अकाउंट नंबर आणि ओटीपीशिवाय बँक खात्यातून इतकी मोठी रक्कम काढल्यामुळं आणि स्मार्टफोनमधील यूपीआय पेमेंट अॅप्सच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महिलेला गुरुद्वाराच्या बुकिंगसाठी गुगल सर्चमध्ये असणाऱ्या क्रमांकावर फोन केला. त्यावेळी महिलेला गुरुद्वाराचे बुकिंग आता ऑनलाइन होते तुम्हाला बुकिंग करायचे असल्यास गुगल पेनं करा. असं सांगण्यात आलं. आरोपीनं महिलेला एक लिंक पाठवली होती. या लिंकवर क्लिक करून गुरुद्वारा बुक करण्यासाठी एक फॉर्म भरुन देण्यास सांगितलं. फॉर्म भरुन दिल्यानंतर महिलेला टोकन अमाउंट म्हणून ५ रुपये भरण्यास सांगितले. महिलेनं लिंकवर क्लिक करून ५ रुपये ट्रान्सफर केले व आरोपीला फोन करून पैसे भरल्याचं कळवलं. यावर आरोपीनं बुकिंग प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत फोन होल्ड करण्यास सांगितलं. काही वेळानंतर महिलेला मेसेज येण्यास सुरुवात झाली. काहीतरी गडबड आहे हे कळताच महिलेनं फोन कट करून मेसेज चेक केले. तेव्हा थोड्या थोड्यावेळानं एक लाख रुपये बँक खात्यातून काढल्याचं लक्षात आलं. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच महिलेनं बँकेशी संपर्क केला तसंच, पोलीस व सायबर सेललाही तक्रार नोंदवली. फोन क्लोन करण्यात महिलेचा फोन होल्डवर ठेवून क्लोन करण्यात आला. क्लॉनिंगच्या माध्यमातून हॅकरला फोनचा पूर्ण अॅक्सेस मिळाला आणि त्यांनी गुगल पेच्या माध्यमातून एक लाखाचा गंडा घातला. वाचाः 'गुगल पे'च्या माध्यमातून पैसे पाठविण्यास सांगून लोकांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. 'गुगल पे'साठी लिंक पाठवून ऑनलाइन भामटे बँक खात्यातील हजारो रुपये परस्पर उकळत असल्याचे समोर आले आहे. गुगल सर्चमध्ये देण्यात आलेले नंबरवर फोन न करता नेहमी अधिकृत वेबसाइटवर असलेल्या कस्टमर केअरला फोन करा.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2DgiVkm

Comments

clue frame