गुगलचा स्मार्टफोन हॅक केल्यास ११ कोटीचं बक्षीस

नवी दिल्लीः गुगलचा स्मार्टफोन पिक्सल (Pixel) हॅक करणाऱ्यास गुगल १० कोटी ७६ लाख रुपयांचं बक्षीस देणार आहे. गुगलनं आपल्या ब्लॉगवर यासंबंधीची माहिती दिली आहे. गुगल पिक्सलमध्ये सध्या चीप बसवण्यात आली आहे. ही अत्यंत सुरक्षित समजली जाते. जर एखाद्या व्यक्तीने हा करून दाखवल्यास त्या व्यक्तीला गुगल तब्बल १.५ मिलियन डॉलर म्हणजेच १० कोटी ७६ लाख रुपये बक्षीस म्हणून देणार आहे. टायटन एम (Titan M) हे स्मार्टफोनमधील सर्वांना सुरक्षा देण्याचं काम करतेय. सध्या हे सर्वात सुरक्षित समजले जाते. फोनमध्ये बील्ट इन सिक्युरिटी देण्यासाठी टायटन एमला सर्वात जास्त रेटिंग देण्यात आली आहे. आम्ही जाणीवपूर्वक यावर बक्षीस ठेवले आहे. संशोधकांनी या फोनमध्ये काही तरी कमतरता शोधावी हा या मागचा उद्देश असल्याने आम्ही हे बक्षीस ठेवले आहे, असे गुगल कंपनीने स्पष्ट केले आहे. जर संशोधकांनी या फोनमध्ये काही कमी शोधल्यास त्याला बक्षीस देऊन आम्ही आमच्या ग्राहकांना सर्वात चांगली सेवा देऊ, असेही कंपनीने म्हटले आहे. हे सर्व आम्ही आमच्या ग्राहकांसाठी करती असल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. गुगलने अँड्रॉयड व्हर्जन हॅक करणाऱ्यावरही बक्षीस ठेवले आहे. आम्ही अँड्रॉयडसाठी काही खास प्रीव्ह्यू व्हर्जनसाठी एक स्पेशल प्रोग्राम लाँच करीत आहोत. यात काही कमतरता शोधल्यास ५० टक्के रक्कम बोनस म्हणून दिली जाणार असल्याचे गुगल कंपनीने स्पष्ट केले आहे. गुगलने आतापर्यंत १८०० रिपोर्ट्सला बक्षीस दिले आहे. चार वर्षात कंपनीने तब्बल ४ मिलियन डॉलर बक्षीस म्हणून दिले आहे. गेल्या १२ महिन्यात कंपनीने गुगलच्या सिस्टममध्ये कमी शोधणाऱ्यास बक्षीस म्हणून १.५ मिलियन डॉलर म्हणजेच ११ कोटीच्या आसपास रुपये दिले आहेत.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/37p3pAh

Comments

clue frame