फेसबुकची भारतीय स्टार्टअपला खुशखबर

नवी दिल्ली : फेसबुकच्या मालकीची इंस्टंट मेसेज कंपनी ने देशातील ५०० स्टार्टअप कंपन्यांना खुशखबर दिली आहे. स्टार्टअप कंपन्यांना फेसबुकवर ५०० डॉलर म्हणजे जवळपास ३५ हजार ८४० रुपयांपर्यंतची जाहिरात मोफत देण्याची सुविधा दिली आहे. भारतातील स्टार्टअप कंपन्यांना जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत जाता यावं हा यामागचा उद्देश सांगण्यात आला आहे. उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागाने मान्यता दिलेल्या ५०० स्टार्टअप कंपन्यांना मोफत जाहिरातीची सुविधा दिली जाईल, असं WhatsApp ने सांगितलं. या कंपन्यांना फेसबुक अॅड क्रेडिट म्हणून मिळेल. विक्री वाढवण्यासाठी या कंपन्यांना जाहिरातींचा वापर करता येईल. फेसबुकच्या मदतीने जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत जाता येईल. जाहिरातींवर क्लिक करताच ग्राहक कंपन्यांशी थेट WhatsApp वर बोलू शकतील. यापूर्वी व्हॉट्सअपने 'स्टार्टअप इंडिया-व्हॉट्सअप ग्रँड चॅलेंज' सुरू केलं होतं. या अंतर्गत भारतीय बाजारात सामाजिक-आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या पाच उद्योगपतींना ५०-५० हजार डॉलर म्हणजे जवळपास ३५ लाख रुपये दान दिले होते. 'स्टार्टअप आणि छोटे व्यवसाय या देशातील जीवनरेषा आहेत. सोबतच यावर स्थानिक अर्थव्यवस्थाही अवलंबून आहे. भारतीय उद्योग सामाजिक आणि आर्थिक बदल घडवून आणण्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. व्हॉट्सअप या उद्योगांची मदत करण्यासाठी बांधिल आहे', अशी प्रतिक्रिया व्हॉट्सअप इंडियाचे प्रमुख अभिजित बोस यांनी दिली. जे अगोदर येईल त्याला सुविधा मिळेल या तत्वावर हा उपक्रम आहे. जगभरात ५० लाख उद्योग हे व्हॉट्सअपच्या बिझनेस App चा वापर करतात. यामध्ये १० लाख भारतीय उद्योग आहेत. आता फेसबुकच्या या ऑफरमुळे ग्राहक व्हॉट्सअपच्या माध्यमातून थेट स्टार्टअप कंपन्यांशी जोडले जातील.


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2roj3LX

Comments

clue frame