मुंबई : जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इंस्टाग्राम गुरुवारी दुपारी डाऊन झाल्यामुळे युझर्सना अडचणीचा सामना करावा लागला. Down Detector च्या मते, गुरुवारी दुपारी २.१५ वाजता हा प्रकार समोर आला. यानंतर संपूर्ण ब्रिटनमधील युझर्सना याचा फटका बसला. भारतातही अनेक युझर्सने फेसबुक डाऊन असल्यामुळे काही फीचर्स काम करत नसल्याची तक्रार केली. ब्रिटनसह डेन्मार्क, जर्मनी, हंगेरी, स्पेन, फ्रान्स, आणि पोलंडमध्येही याच समस्येचा सामना करावा लागला. फेसबुक आणि इंस्टाग्राम डाऊन होण्यामागचं कारण नेमकं काय होतं, ते अजूनही समोर आलेलं नाही. यापूर्वीही अनेकदा याच समस्येला सामोरं जावं लागलं होतं. ज्या युझर्सने इंस्टाग्राम डाऊन झाल्याची तक्रार केली, त्यापैकी ७४ टक्के युझर्सना न्यूज फीड लोड करण्यासाठी अडथळा येत होता. १४ टक्के युझर्सना स्टोरीज फीचर आणि १० टक्के युझर्सना वेबसाइटवर अडचणीला सामोरं जावं लागलं. कमेंट्स होत नसल्याचीही काही युझर्सची तक्रार होती. फेसबुक डाऊन झाल्याची तक्रार करणाऱ्या युझर्सपैकी ६५ टक्के युझर्सना लॉग इन करण्यासाठी समस्या आली. २२ टक्के युझर्स फोटो पाहू शकत नव्हते आणि ११ टक्के युझर्ससाठी वेबसाइट पूर्णपणे बंद झाली होती. असंख्य युझर्ससाठी वेबसाइट डाऊन झाली आणि error message समोर आला. भारतात दिल्ली आणि बंगळुरूमध्ये ही समस्या जास्त प्रमाणात जाणवली. फेसबुक काही मेंटेनन्स कामासाठी डाऊन असून पुढील काही मिनिटात तुम्ही वापर करू शकाल, असाही मेसेज काही युझर्सना दिसला. दरम्यान, फेसबुक डाऊन होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही जगभरात फेसबुक डाऊन झाल्याचा प्रकार घडला आहे. कॉमन सर्व्हरमुळे असं होत असल्याचं त्यावेळी फेसबुकने सांगितलं होतं.
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2OtVhHu
Comments
Post a Comment