नवी दिल्लीः नेहमी आपल्या युजर्ससाठी नवीन फिचर्स घेऊन येत असतात. व्हॉट्सअॅपचं बहूचर्चित आता लवकरच लाँच होणार आहे. या फिचरवर व्हॉट्सअॅप गेल्या वर्षभरापासून काम करत आहे. या फिचरची लाँच डेट जरी अद्याप जाहीर झाली नसली तरी WABetaInfoनं दिलेल्या रिपोर्टनुसार डार्क मोड फिचर लवकरच आयओएस युजर्ससाठी लाँच होणार आहे. व्हॉट्सअॅपच्या नवीन फिचर्स आणि अपडेटची माहिती ठेवणाऱ्या WABetaInfoनं व्हॉट्सअॅपचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत आयफोनमध्ये अॅपचं बॅकग्राउंड पूर्णपणे ब्लॅक दिसत असून त्यावरील अक्षर पांढऱ्या रंगात दिसत आहे. आयफोनप्रमाणेच कंपनी अँड्रोइड युजर्ससाठीही डार्क मोड फिचवर काम करत आहे. वाचाः वाचाः डार्क बबल बग आयओएस १३ ऑपरेटिंग सिस्टम वापरणारे आयफोन युजर्सना हे फिचर वापरता येणार आहे. डार्क मोड मध्ये व्हॉट्सअॅपवरील आयकॉन ब्लू आणि ग्रे रंगात दिसणार आहेत. या फिचरमध्ये डार्क बबल नावाचा एक बग असल्यानं अॅप सारखे क्रॅश होत आहे. कंपनीकडून या बगवर काम सुरू असून लवकरच हे फिचर युजर्ससाठी लाँच करण्यात येणार आहे. नवीन आयकॉन व्हॉट्सअॅपनं काही बीटा अपडेट अँड्रोइड व्हर्जनसाठीही लाँच केले आहेत. नवीन अपडेटमध्ये कॅमेरा, चॅट आणि व्हॉट्सअॅप स्टेटससाठी नवीन आयकॉन दिले आहेत. तसंच, व्हॉइस मेसेज सुरू केल्यानंतर अॅप क्रॅश होण्याची समस्याही कंपनीनं सोडवली आहे. कंपनी लवकरच युजर्ससाठी नवीन फिचरसह अपडेट घेऊन आहे. या अपडेटमध्ये काही इमोजीसुद्धा असणार आहेत.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2NNR3dn
Comments
Post a Comment