नवी दिल्ली : असुसचा Asus ६Z हा फ्लॅगशिप फोन टॉप ऑफ द लाइन हार्डवेअर आणि परफॉर्मन्समुळे इतर फोनपेक्षा वेगळा ठरतो. भारतात ३१ हजार ९९९ रुपयात लाँच केलेल्या या फोनची किंमत आता अधिकृतपणे ४००० रुपयांनी कमी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी लाँच झालेल्या Asus ५Z (Zenfone ५Z) ची किंमतही ७००० रुपयांनी कमी करण्यात आली आहे. दोन्ही फोन खरेदीसाठी फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत. वाचा : Asus ६Z हा फ्लॅगशिप फोन आतापर्यंत ३१ हजार ९९९ रुपयांमध्येच उपलब्ध होता. चार हजार रुपये किंमत कमी केल्यामुळे हा फोन २७ हजार ९९९ रुपयात खरेदी करता येईल. ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटमध्ये हा फोन उपलब्ध आहे. तर दुसरं व्हेरिएंट ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजमध्ये मिळेल. १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३४ हजार ९९९ रुपये होती, पण हा फोन आता ३० हजार ९९९ रुपयात खरेदी करता येईल. यामध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज हे टॉप व्हेरिएंट आहे, ज्यावर पाच हजार रुपये सूट मिळेल. ३४ हजार ९९९ रुपयात हा फोन खरेदी करता येईल. गेल्या वर्षी लाँच झालेला Asus ५Z हा फोन आता १६ हजार ९९९ रुपयात उपलब्ध आहे. तर ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची सधअयाची किंमत १८ हजार ९९९ रुपये आहे. कारण, यामध्ये तब्बल सहा हजार रुपये कपात करण्यात आली आहे. ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ७००० रुपयांनी कमी करण्यात आली असून हा फोन सध्या २१ हजार ९९९ रुपयात खरेदी करता येईल. वाचा : या स्मार्टफोनमध्ये एचडी डिस्प्लेसह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८५५ प्रोसेसर आणि ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप मिळेल. प्रायमरी लेन्स ४८ मेगापिक्सेल, तर सेकंडरी लेन्स १३ मेगापिक्सेल आहे. या फोनमध्ये १२३ डिग्री अल्ट्रा वाइड अँगल लेन्स देण्यात आली आहे. हा पॉपअप कॅमेरा असल्यामुळे फ्रंटसाठीही याचाच वापर होतो. या फोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32FjEpo
Comments
Post a Comment