इंग्रजी बोलायला येत असलं तरी एखादा किचकट शब्द तुमचा घात करतो. त्याचा उच्चार फसला की खजील झाल्यासारखं होतं. ही वेळ येऊ नये, म्हणून तोंडातल्या तोंडात उच्चार करून वेळ मारून न्यावी लागते. मात्र, आता गुगल मास्तर तुमची ही अडचण दूर करणारेत.
एखाद्या शब्दाचा अचूक उच्चार कसा करायचा, हे शिकवण्यासाठी गुगलनं एक नवं फीचर आणलंय. गुगल सर्चमध्येच हे नवं फीचर असेल. या आधी गुगल सर्चवर एखाद्या शब्दाचा अचूक उच्चार ऐकता यायचा. मात्र, आता बोलताही येईल.
WhatsApp ने आणलं नवं फिचर; वाचा कोणतं आहे ते...
गुगलनं या फीचरसाठी मशिन लर्निंगचा वापर केलाय. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून एखाद्या शब्दाचा उच्चार कसा केला जातो, हे तपासलं जातं. गुगलचं स्पीच रिकग्निशन टूल (Google Speech Recognition Tool) तुम्ही उच्चार केलेल्या शब्दावर प्रक्रिया करेल आणि तज्ज्ञाच्या उच्चाराशी त्याचा मेळ घातला जाईल. त्यासाठी स्पीक नाऊ हा ऑप्शन देण्यात आलाय. त्यावरच्या माईकच्या आयकॉनवर क्लिक करून त्या शब्दाचा उच्चार करू शकता.
आपल्या उच्चारानंतर हा शब्द चुकीचा उच्चारला की योग्य ? तुम्ही चूक केली असेल तर ती कोणती ? आणि ही चूक कशी दुरुस्त करायची? हे सर्व सांगितलं जाईल.
गुगल घेऊन आलाय Recorder!
सध्या तरी हे इंग्रजीसाठी उपलब्ध आहे. मात्र येत्या काळात आणखी भाषांचा त्यात समावेश होईल. सध्या तरी ते प्रायोगिक तत्त्वावर केवळ मोबाईल फोनवर उपलब्ध आहे. त्यामुळे येत्या काळात तुम्हाला बोलताना एखाद्या शब्दासाठी सावधगिरी बाळगायची गरज नाही. तुम्ही फाडफाड इंग्रजी बोलू शकता
WebTitle : google speech recognition tool for perfect pronunciation

from News Story Feeds https://ift.tt/2NWAE6x
Comments
Post a Comment