मोबाइल इंटरनेट १ डिसेंबरपासून महागणार

नवी दिल्लीः एअरटेल, , आणि बीएसएनएलने लवकरच आपला मोबाइल डाटाचे दर वाढवण्याची घोषणा केल्याने सेवा महागणार आहे. भारतात इंटरनेट वापरणाऱ्या कोट्यवधी लोकांना याचा फटका बसणार आहे. जगभरातील चीन, जपान आणि दक्षिण कोरियाच्या तुलनेत सर्वात स्वस्त मोबाइल डेटा सेवा भारतात मिळत आहे. भारतीय बाजारात आणि व्होडाफोन-आयडियाची सर्वात जास्त भागीदारी आहे. दोन्ही कंपन्यांनी वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत १० अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. सुप्रीम कोर्टाने एका जुन्या प्रकरणावर सुनावणी करताना आदेश दिले होते की, टेलिकॉम कंपन्यांना ९० हजार कोटी रुपये सरकारला द्यावे लागणार आहे. यानंतर व्होडाफोनने नुकतेच सांगितले की, मोबाइल डेटा आधारित सेवेला वाढती मागणी असूनही भारतात सर्वात स्वस्त मोबाइल डेटा मिळतो आहे व्होडाफोन आयडिया १ डिसेंबरपासून आपले टॅरिफचे दर वाढवणार असल्याने इंटरनेट सेवा महागणार आहे. एअरटेलकडूनही याची घोषणा करण्यात आली आहे. नवीन दर किती असणार याविषयी अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. जिओ आणि भारत संचार निगम लिमिटेड () ने याची घोषणा केली आहे. मोबाइल कंपन्या इंटरनेटचे दर वाढवणार असल्याने याचा फटका लाखो ग्राहकांना बसणार आहे. भारतात २२ टेलिकॉम सर्कल आहे. त्यात तीन गट आहेत. कंपनी एकाचवेळी १५ ते २० टक्के दर वाढवण्याची शक्यता नाही.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2KIMBKV

Comments

clue frame