३५ मिनिटांत फुल्ल चार्ज होणार रियलमीचा हा फोन

नवी दिल्लीः रियलमीनं भारतात 'रिअलमी एक्स२ प्रो' आणि 'रिअलमी ५ एस' हे दोन नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. '' स्मार्टफोनमध्ये १२ जीबी रॅम व २५६ जीबी स्टोरेज देण्यात आली असून या स्मार्टफोनची किंमत ३९,९९९ आहे. ३५ मिनिटांत फुल्ल चार्ज होणार 'रिअलमीचा एक्स२ प्रो' स्मार्टफोनमध्ये ५० w सुपर व्हीओओसी फ्लॅश चार्ज टेक्नॉलजी दिली आहे. स्मार्टफोनमध्ये ४,००० एमएच बॅटरी दिली फक्त अर्ध्या तासात फोन फुल्ल चार्ज होणार असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. इतकंच नव्हे तर, पबजी खेळता खेळताही फोन ८० टक्के चार्ज होणार असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. 'रिअलमी एक्स२ प्रो'चे फिचर स्मार्टफोनमध्ये ९० एचझेड अल्ट्रा स्मूथ डिस्प्ले दिला आहे. तसंच, एफएचडी+ रिझोल्यूशनसोबत ६.५ इंच सुपर अल्मोड स्क्रीन दिली आहे. क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८५५ प्रोसेसर दिला आहे. १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरियंटची किंमत ३३, ९९९ रुपये आहे. तर, ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरियंटची किंमत २९, ९९९ किंमत आहे. ६४ मेगापिक्सल कॅमेरा 'रियलमी एक्स२ प्रो'मध्ये ४ रियर कॅमेरा दिले आहेत. ६४ मेगापिक्सल कॅमेराबरोबरच ११५ डिग्री फिल्ड ऑफ व्ह्यूसोबत ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड कॅमेरा दिला आहे. स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेला २०एक्स हायब्रिड झूममुळं फोकस चांगला होण्यास मदत होते. सेल्फीसाठी एडीआर आणि एआय ब्यूटीफिकेशनसोबत १६ मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे. ०.२३ सेकंदात अनलॉक होणार स्मार्टफोन रिअलमीचा हा स्मार्टफोन यूएफएस३.०सोबत लाँच झाला आहे. या फिचरमुळं रीड आणि राइट स्पीड ८० टक्के वाढणार आहे. ०.२३ सेकंदात स्मार्टफोन अनलॉक होईल असं कंपनीचं म्हणणं आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2pAsmb3

Comments

clue frame