शाओमीने ३ महिन्यात विकले १.२६ कोटी फोन

नवी दिल्ली : भारतीय स्मार्टफोन बाजारात २०१९ च्या तिसऱ्या तिमाहीत स्मार्टफोनच्या विक्रीत अभूतपूर्व वाढ झाली आहे. या तिमाहीत ४६.६ मिलियन युनिट्सची विक्री करण्यात आली. यामध्ये सर्वात मोठा वाटा शाओमीचा आहे. शाओमीने १.२६ कोटी युनिट्सची विक्री केली. दरम्यान, टॉप-५ कंपन्यांमध्ये सर्वात मोठा फटका सॅमसंगला बसला आहे. इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशन म्हणजेच आयडीसीने ही आकडेवारी जारी केली आहे. भारतातील सण-उत्सवांचा काळ आणि ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर दिला जाणारा भरघोस डिस्काऊंट यामागचं कारण सांगण्यात आलं आहे. वाचा : आयडीसीच्या आकड्यांनुसार, १.२६ कोटी युनिट्सच्या विक्रीसह शाओमी पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत शाओमीची ८.५ टक्क्यांनी वाढ झाली. Redmi 7A आणि Redmi Note 7 Pro हे सर्वात विकलेले फोन ठरले. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सॅमसंगने ८८ लाख युनिट्सची विक्री केली. सॅमसंगच्या वार्षिक विक्रीत ८.५ टक्क्यांची घसरण झाली आहे. १५ ते ३५ हजार रुपये किंमतीच्या फोनचा या विक्रीत एकूण १८.९ टक्के हिस्सा आहे. ही गेल्या वर्षीच्या तुलनेत ६ टक्के वाढ आहे. २१ ते २५ हजार रुपये किंमतीच्या सेगमेंटमध्ये सर्वात वेगवान वाढ झाली आहे. या सेगमेंटची विक्री जवळपास दुपटीने वाढली. OnePlus 7, Redmi K20 Pro आणि vivo V15 Pro या फोनला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली. यानंतर १५ ते २१ हजार रुपये किंमतीच्या सेगमेंटमध्येही मोठी वाढ झाली आहे. यात Galaxy A50, Redmi Note 7 Pro आणि vivo Z1 Pro या स्मार्टफोनचा समावेश आहे. वाचा : आयडीसीच्या असोसिएट रिसर्च मॅनेजर उपासना जोशी यांच्या मते, ‘ई कॉमर्स वेबसाइटवर आकर्षक ऑफर, बायबॅक ऑफर आणि नो कॉस्ट ईएमआय यामुळे विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वर्षानुवर्षे २८.३ टक्क्यांनी वाढणारा हा आकडा आता ४५.४ टक्क्यांवर गेला आहे.’


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2KenZcH

Comments

clue frame