अॅपलचे सोन्याचे इअरपॉड्स! किंमत किती माहितीय?

नवी दिल्ली: अॅपलने मागील महिन्यात आपले रिडिझाइन केलेले इअरपॉड बाजारात आणले आहेत. त्यांची आधीची आवृत्ती आता रशियन लक्झरी गॅझेट कंपनीने कस्टमाइज केली आहे. प्रिमीयम डिवाइसेस आणि गॅझेट्सचा लक्झरी मेकओव्हर करणारी कंपनी कॅव्हियारने आता कस्टमाइज केले आहेत आणि त्यांना १८ कॅरेट सोन्याचा मुलामा दिला आहे! या इअरपॉड्सची किंमत सुमारे ४८ लाख रुपये आहे. अॅपल इअरपॉड्सला पूर्णपणे सोन्याचं कव्हर आहे, त्यांचा केसही सोनेरी मुलामा दिलेला आहे. मात्र या सोन्याच्या मुलाम्यामुळे या इअरपॉड्सचे वजन मूळ डिझाइनपेक्षा जास्त आहे. हे लक्झरी इअरपॉड्स वापरताना यूजर्सना एक्स्ट्रा युनिक फिंलींग येईल. कॅव्हियारला आपल्या लक्झरी आणि काल्पनिक क्रिएशन्समुळे ओळख मिळाली आहे. अॅपले याआधीही अनेक गॅझेटस् लाँच केले आहेत. कंपनीच्या एलिगेटर स्कीनवाल्या आयफोन मॉडेलसह मून रॉकवालं केस आणि गोल्डन स्मार्टवॉटही अॅपलने लाँच केले आहेत. आता ऑल व्हाइट इअरपॉड्सला कंपनीने गोल्डन टच दिला आहे. हे इअरपॉड्स लाँच करताना कॅव्हियारने याचे काही फोटोही शेअर केले आहेत. आपल्या वेबसाइटवर कंपनीने कॅव्हियार इअरपॉड्स गोल्ड एडिशनचे तपशील शेअर केले आहेत. ने आपले इअरपॉड्स नॉइज कॅन्सलेशन आणि सुपीरिअर साउंडसह लाँच केले आहेत आणि अलीकडेच याच अद्ययावत व्हेरिअंटही लाँच केलं आहे. या डिव्हाइसमधील वन-टॅप सेटअप अनुभवाव्यतिरिक्त, सर्वोत्कृष्ट ध्वनी आणि आयकॉनिक वायरलेस डिझाइन युझरला दिले गेले आहेत. नवीन Apple इअरपॉड्स प्रो व्यतिरिक्त Apple ने जुन्या मॉडेल्सची नवीन किंमतही शेअर केली आहे. फर्स्ट जनरेशन Apple इअरपॉड्स त्याच्या चार्जिंगसह १४,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहेत.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2KiuAmj

Comments

clue frame