मुंबई : WhatsApp ने नवीन अँड्रॉईड बीटा अपडेट जारी केली आहे, ज्यात डिझाईनमध्ये काही बदल दिसून येत आहेत. शिवाय एक बगही दुरुस्त केला आहे. नवीन अपडेट बीटा व्हर्जनच्या २.१९.३२८ मध्ये देण्यात आली आहे. लवकरच सर्व युझर्सना ही अपडेट मिळणार आहे. काही वृत्तांनुसार, WhatsApp चा कॅमेरा आयकॉनही बदलणार आहे, जो आतापर्यंत इंस्टाग्रामच्या लोगोसारखा दिसत होता. वाचा : WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, WhatsApp चा नवीन कॅमेरा आयकॉन स्टेटस टॅबमध्ये पाहिला जाऊ शकतो. याशिवाय चॅट बारमध्येही कॅमेरा आयकॉन बदलणार आहे. हा कॅमेरा आयकॉन अगोदर इंस्टाग्रामसारखाच दिसत होता. पण हा आयकॉन नव्या रुपात आता कॅमेऱ्यासारखा दिसणार आहे. याशिवाय बीटा अपडेटमध्येही एक बग फिक्स करण्यात आला आहे. व्हॉईस मेसेज ऐकताना कधी-कधी हा मेसेज या बगमुळे अचानक बंद होत होता. सर्वच युझर्सना ही समस्या सतावत नसली तरी हा बग मात्र WhatsApp ने आता दूर केला आहे. वाचा : यापूर्वी WhatsApp ने डार्क मोड आणि पहिल्यापेक्षा जास्त Group invite यांसारखे फीचर्स जारी केले होते. युझर्सला कोणत्या ग्रुपमध्ये कुणी Add करावं याची निवड आता युझर्सलाच देण्यात आली आहे. युझर्सना कोणत्याही ग्रुपमध्ये Add केलं जात होतं, ज्यामुळे प्रायव्हसीचा धोका तर होताच, मात्र काही आक्षेपार्ह आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या ग्रुपवर कायदेशीर कारवाईच्या घटनाही घडल्या आहेत.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Qifj91
Comments
Post a Comment