नवी दिल्लीः तरुणांचा गळ्यातील ताईत असलेलं लोकप्रिय मॅसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपनं एक नवीन फिचर लाँच केलं आहे. आयओएस व्हर्जनसाठी एक खास अपडेट रोलआउट केलं आहे. वेटिंग फिचर असं या फिचरचं नाव असून २.१९.१२० या व्हॉट्सअॅपच्या नवीन अपडेटवर हे युजर्सना दिसणार आहे. या अपडेटमध्ये चॅट स्क्रीनलाही वेगळा लूक दिला आहे. जेणेकरून कॉलवर बोलत असतानाही व्हॉट्सअॅपवर चॅटिग करता येणार आहे. वाचाः व्हॉट्सअॅपवर कॉल करणाऱ्या युजर्सना होणार फायदा आयओएस युजर्सना ऑडिओ कॉल सुरू असताना व्हॉट्सअॅपच्या या फिचरचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर, कॉलिंगसाठी जे युजर्स कॉलिंगसाठी व्हॉट्सअॅप कॉलचा वापर करतात त्याच्यासाठीही हे फिचर उपयोगाचं ठरणार आहे. लवकरच हे फिचर अँड्रोइड युजर्ससाठी येणार आहे. अॅप स्टोअरनं करा अपडेट तुम्ही आयओएस युजर असाल आणि व्हॉट्सअॅपचं हे फिचर तुम्हाला तुमच्या आयफोनमध्ये हवं असल्यास अॅप स्टोअरमध्ये जाऊन व्हॉट्सअॅप अपडेट करा. वाचाः प्रायव्हसी वाढणार आयओएससाठी असलेल्या या अपडेटमध्ये युजर्सच्या प्रायव्हसीचाही उल्लेख केला आहे. युजर्सना कोणत्या ग्रुपमध्ये अॅड व्हायचं आहे आणि ग्रुपमध्ये तुम्हाला कोण अॅड करू शकतं हे ठरवता येणार आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/37Akw2p
Comments
Post a Comment