मुंबई : स्मार्टफोन मार्केटमध्ये सर्वात चांगला कॅमेरा फोन देण्याची जणू स्पर्धाच सुरू आहे. शाओमीने चीनमध्ये नुकताच १०८ मेगापिक्सेल कॅमेराचा फोन लाँच केला. प्रसिद्ध कंपनी सॅमसंगही आता ८K व्हिडीओ रेकॉर्डिंग सपोर्टेड फोन आणण्याच्या तयारीत आहे. एक्सडीए डेव्हलपर्सच्या रिपोर्टनुसार, आगामी Galaxy S11 8K व्हिडीओ रेकॉर्डिंग फीचरसह येईल हे सॅमसंग कॅमेरा App च्या APK फाइलच्या (अँड्रॉईड App सॉफ्टवेअर फाइल) नव्या कोडवरुन स्पष्ट होतं. आगामी वर्षाच्या सुरुवातीलाच लाँच होणाऱ्या Galaxy S11 मध्ये १०८ मेगापिक्सेल ISOCELL ब्राइट HMX सेंसर नसेल, तर यामध्ये अपग्रेडेड सेकंड जनरेशन सेन्सर वापरलं जाईल, असा दावा प्रसिद्ध लीकस्टर Ice Universe ने केला होता. सॅमसंग १०८ मेगापिक्सेल लेन्समध्ये सेकंड जनरेशन व्हर्जन वापरणार असल्याचं वृत्त जास्त विश्वसनीय मानलं जातं. कारण, मूळ व्हर्जनचा वापर सर्वात अगोदर शाओमीच्या फोनमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे मध्ये अपग्रेडेड १०८ मेगापिक्सेल लेन्स असण्याची दाट शक्यता आहे. लीक रिपोर्टनुसार, Samsung Galaxy S11 तीन स्क्रीन व्हेरिएंटमध्ये येण्याची शक्यता आहे. ६.२ किंवा ६.४ इंच आकाराची सर्वात छोटी स्क्रीन असू शकते. तर ६.७ इंच ही सर्वात मोठी स्क्रीन असू शकते. प्रसिद्ध लीकस्टर इवान ब्लासच्या दाव्यानुसार या फोनचे पाच व्हेरिएंट असतील. Samsung Galaxy S11 चे दोन छोटे व्हेरिएंट्स 5G आणि LTE सपोर्टेड असतील, तर ६.७ स्क्रीन साइज व्हेरिएंट फक्त 5G असेल, असाही दावा करण्यात आला आहे. एक्सडीए डेव्हलपर्सच्या रिपोर्टनुसार, सॅमसंग कॅमेरा App मध्ये डायरेक्टर्स व्यू, नाइट हायपरलॅप्स, सिंगल टेक फोटो, व्हर्टिकल पॅनोरमा आणि कस्टम फिल्टर्स यांसारखे फीचर्स मिळतील. नुकत्याच समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार, Samsung Galaxy S11 हा फोन पुढच्या वर्षी फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात लाँच होण्याची शक्यता आहे आणि लाँचिंग इव्हेंट सेन फ्रान्सिस्कोमध्ये होईल.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2CTGwXR
Comments
Post a Comment