मुंबई: स्मार्टफोनची निर्मिती करणारी कंपनी 'लावा'नं त्यांचा बजेट फोन झेड ४१ ( z41 )लॉन्च केला आहे. हा फोन दोन रंगात उपलब्ध असून ऑफलाइन रिटेल स्टोअर मधून खरेदी करता येणार आहे. फोनमध्ये २५००mAhची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनमध्ये १२८जीबी पर्यंत स्टोरेज वाढवण्याची सुविधा देण्यात आली असून फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा असून हा फोन 4G VoLTE सपोर्ट करतो. काय आहे किंमत? या फोनची किंमत केवळ ३,८९९ रुपये असून मिटनाइट ब्लू आणि अंबर रेड या दोन रंगात हा फोन उपलब्ध आहे. भारतातील ६०,०००हून जास्त रिटेल स्टोअरमधून या फोनची विक्री होणार आहे. फोनसोबतच १२०० रुपयांचा कॅशबॅकही मिळणार आहे. तसंच जिओ युजर्ससाठी ५० जीबी अतिरिक्त डेटा देखील मिळणार आहे. लावाचा हा फोन अॅन्ड्रॅाइड पाई या ऑपरेटींग सिस्टीमवर काम करतो. फोनमध्ये ड्युअल सिम सेटअप देण्यात आलं असून ५.० इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. ४८०*८५४p असं या फोनच्या डिस्प्लेचं रिझॉल्यूशन असणार आहे. फोनमध्ये क्वाड कोर प्रोसेसर देण्यात आला असून १जीबी रॅम देण्यात आली आहे. तसंच १६जीबीची इंटरनल मेमरी १२८ जीबी पर्यंत वाढवता येणार आहे. फोटोग्रॅफीसाठी या फोनमध्ये ५ MPचा रियर कॅमेरा देण्यात आला असून २ MPचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. या कॅमेऱ्यात ब्यूटी मोड, HDR मोड, बर्स्ट मोड, ऑडियो नोट, पॅनोरमा, नाइट शॉट, स्मार्ट स्लीप यांसारखे फीचर्स आहेत. फोनमध्ये २,५००mAhची बॅटरी आहे. जी २१ तासांचा टॉकटाइम बॅकअप देते. फोनचं वजन १६० ग्रॅम असून कनेक्टिव्हीटीसाठी फोनमध्ये वायफाय, ब्लू टूथ USB OTG आणि GPS/AGPS एफअम सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ByiSzm
Comments
Post a Comment