नवी दिल्लीः चीनची स्मार्टफोन बनवणारी कंपनी लवकरच आपला () हा स्मार्टफोन येत्या १५ ऑक्टोबरला लाँच करणार आहे. हा फोन लाँच करणार असल्याची माहिती कंपनीने युरोपियन हँडलवरून दिली आहे. हा फोन लाँच होण्याआधीच या फोनचे काही फीचर्स चीनमध्ये लीक झाले आहेत. रियलमी कंपनीने फोन लाँच होणार असल्याची माहिती युरोपच्या पेजवर दिली आहे. या फोनची माहिती लीक झाली असून या माहितीनुसार, या फोनमध्ये एक्स २ मध्ये क्वॉलकॉमचे स्नॅपड्रॅगन ८५५ प्लस प्रोसेसर मिळणार आहे. तसेच या फोनमध्ये चार रियर कॅमेरा म्हणजेच क्वॉड रियर सेटअपचा देण्यात येणार आहे. यात फ्रंट कॅमेरा ६४ मेगापिक्सलचा असणार आहे. चार कॅमेऱ्यापैकी एक कॅमेरा अल्ट्रा वाइल्ड अँगल लेन्स, दुसरा लेन्स टेलिफोटो आहे. तर तिसरा लेन्स डेफ्थ आहे. या फोनमध्ये २०Xहायब्रिड झुम मिळणार आहे. तसेच यात ९० एचझेड चा डिस्प्ले देण्यात येणार आहे. या फोनमद्ये ५० वॉटची चार्जिंग देण्यात येणार आहे. या फोनमधील बॅटरीची क्षमता ४००० एमएएच क्षमतेची असणार आहे. हा फोन भारतात कधी लाँच होणार आहे, यासंंबंधी कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2M0Rm3y
Comments
Post a Comment