डीटीएचधारकांसाठी खूशखबर; SMSनं चॅनल घेता येणार

नवी दिल्ली: धारकांसाठी खूशखबर आहे. एका टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून चॅनल सबस्क्राइब किंवा अनसबस्क्राइब करता येणार आहे. लवकरात लवकर एसएमएसच्या माध्यमातून चॅनल जोडण्याची किंवा हटवण्याची सुविधा देण्यात यावी, असे आदेश म्हणजेच ट्रायनं डिस्ट्रीब्युशन प्लॅटफॉर्म्स ऑपरेटर्सना (डीपीओ) दिले आहेत. डीटीएचधारकांना आता टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून आता चॅनल घेता येणार आहे किंवा हटवता येणार आहे. ९९९ क्रमांकावर सर्व चॅनल्सची यादी एमआरपीसह उपलब्ध करून देण्यात यावी, असे आदेशही ट्रायनं सर्व डीपीओंना दिले आहेत. ही सुविधा दिल्यानं डीटीएचधारकांना आपल्या पसंतीचे चॅनल निवडता येणार आहेत. तसंच प्रत्येक चॅनलसाठी आपण किती पैसे मोजणार आहोत याचीही माहिती मिळणार आहे. १५ दिवसांच्या आत द्यावी लागणार सुविधा ९९९ क्रमांकावर सर्व माहिती उपलब्ध करून देण्याचे आदेश ट्रायने डीपीओंना दिले आहेत. ट्रायच्या आदेशानुसार, एसएमएसच्या माध्यमातून चॅनल घेण्याची किंवा हटवण्याची सुविधाही डीटीएचधारकांना पंधरा दिवसांच्या आत द्यावी लागणार आहे. इतकेच नव्हे तर ट्रायच्या आदेशानुसार, डीटीएच धारकांनी पाठवलेल्या विनंत्याही डीपीओंना ७२ तासांच्या आत लागू कराव्या लागणार आहेत. तसंच नव्या नियमांनुसार सबस्क्रायबर्सना ज्या कालावधीसाठी सेवा घेतली आहे, तितक्याच कालावधीसाठी शुल्क आकारले जाणार आहे. सबस्क्रायबरच्या हितासाठी आवश्यक काही डीपीओ एसएमएसच्या माध्यमातून चॅनल सबस्क्राइब किंवा अनसबस्क्राइब करण्याची सुविधा ग्राहकांना देत आहेत, तर काही ऑपरेटर या नियमांचं पालन करताना दिसत नाहीत, असं ट्रायच्या लक्षात आलं आहे. त्याची गंभीर दखलही ट्रायनं घेतली आहे. ग्राहकांना समान आणि चांगली सेवा देण्यासाठी असं करणं गरजेचं आहे. ९९९ क्रमांकावर दिलेली माहिती प्रत्येक ऑपरेटरकडे वेगवेगळी असते. त्यामुळं ग्राहक आवश्यक माहितीपासून वंचित राहतात, असंही ट्रायनं मान्य केलं आहे. ट्रायने ही सुविधा लवकरात लवकर लागू करण्यासाठी २० सप्टेंबरला डीपीओंसोबत यासंबंधी माहिती देण्याच्या पद्धतीवर चर्चा केली होती. २६ सप्टेंबरला झालेल्या बैठकीत ट्रायने डीपीओंकडून मते मागवली होती. ट्रायने आता ही पद्धत अंतिम केली आहे. आता चॅनल घेण्यासंबंधी अथवा हटवण्यासाठी एसएमएस कशा पद्धतीनं पाठवण्यात येणार आहे यावरही लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/35ic5rn

Comments

clue frame