लाखाचा iPhone 11 Pro Max बनतो काही हजारांत!

नवी दिल्ली: iPhone 11 सिरीज लाँच होऊन काही दिवस झाले आहेत. या मालिकेत कंपनीने तीन आयफोन बाजारात आणले आहेत. त्यापैकी सर्वात महाग आहे. फोनच्या ६४ जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत १,०९,९०० रुपये आहे आणि ५१२ जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत १,४१,९०० रुपये आहे. परंतु आपण कधीही इतका महाग आयफोन बनवायला मुळात किती खर्च येतो याचा विचार केला आहे? आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगत आहोत. टीअरडाऊनमध्ये किंमत कळली बनवण्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा अहवाल कल्ट ऑफ मॅकने जारी केला आहे. या अहवालात तंत्रज्ञानाचा उल्लेख आहे. टेक्नाइट्स ही एक सुप्रसिद्ध वेबसाइट आहे. या साइटने iPhone 11 Pro Max ला टीअरडाऊन केले आहे. टीअरडाऊन ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यात फोनच्या सुट्या भागांची वेगवेगळी किंमत मोजली जाते. टेक्निसाइट्सने हे स्पष्ट केले आहे की या टीअरडाऊनमध्ये सांगितलेली किंमत म्हणजे सुरुवातीच्या टीअरडाऊनद्वारे जमवलेल्या माहितीवर आधारित एक अंदाज आहे. कॅमेरा सेटअप सर्वात महाग आयफोन 11 प्रो मॅक्सच्या सर्व सुट्या भागांची एकूण किंमत ४९०.५० डॉलर्स (सुमारे 35,000 रुपये) आहे. भारतातील आयात शुल्कामुळे फोनची किंमत वाढते. आयफोन 11 प्रो मॅक्सचा कॅमेरा सेटअप सर्वात महागडा आहे. त्याची किंमत सुमारे. ७३.५० डॉलर्स (सुमारे ५,३०० रुपये) आहे. फोनमधील दुसरा सर्वात महागडा भाग म्हणजे ओईएलईडी डिस्प्ले. याची किंमत टीअरडाऊनमध्ये ६६.६० डॉलर्स (सुमारे ४,४१७ रुपये) दर्शविली गेली आहे. आयफोन 11 प्रो मॅक्सचा तिसरा महागडा सुटा भाग मध्ये पॉवरफुल ए 13 चिपसेट आहे. या चिपसेटची किंमत ६४ डॉलर्स (सुमारे ४,५३२ रुपये) आहे. विक्री किंमतीपेक्षा मूळ किंमत खूपच कमीफोनमधील इतर पार्ट्सविषयी बोलायचे तर त्यांची एकूण किंमत ५०० डॉलर्सपर्यंत आहे. आयफोन 11 प्रो मॅक्सच्या विक्री किंमतीपेक्षा ही किंमत ४५ टक्के कमी आहे. ही केवळ फोनमधील घटकांची किंमत आहे. असेंब्लींगची प्रक्रिया जोडल्यावर आयफोन 11 प्रो मॅक्सची किंमत आणखी वाढते. याचा सरळ अर्थ असा आहे की Apple ५० टक्के नफा कमवत आहे. गॅलेक्सी नोट 10+ चे देखील टीअरडाऊन याच वेबसाइटने यावर्षी फेब्रुवारीमध्ये लॉन्च झालेल्या सॅमसंग गॅलेक्सी नोट 10+ चेही टीअरडाऊन केले होते. Phone ९९९ डॉ़लर्सचा लाँच झालेल्या या फोनची किंमत टेक्नाइट्सने टीअरडाऊनमध्ये ४२० डॉलर्स सांगितली आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2OGw6C1

Comments

clue frame