Flipkart वर मोबाईल फेस्टिव्ह, भरघोस सूट

मुंबई : दिवाळी ऑफर्समध्ये तुम्हाला ऑनलाईन खरेदी करता आली नसेल तर पुन्हा एकदा चांगली संधी चालून आली आहे. फ्लिपकार्टचा आज बुधवारपासून सुरु झाला आहे, जो ३१ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहिल. या ऑफरनुसार, विविध कंपन्यांच्या मोबाईलवर भरघोस सूट देण्यात आली आहे. मोबाईल खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. रियलमी ५ या स्मार्टफोनची किंमत १०,९९९ रुपये आहे. सूट मिळाल्यानंतर ग्राहकांना हा फोन ८९९९ रुपयांनाच मिळेल. तुम्ही हा फोन प्रीपेड ऑर्डर केल्यास १० टक्के म्हणजे, ९०० रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. म्हणजेच रियलमी ५ तुम्ही ८०९९ रुपयातच खरेदी करु शकता. याशिवाय नो कॉस्ट ईएमआय आणि सहा महिने यूट्यूब प्रीमिअमचीही ऑफर उपलब्ध आहे. सॅमसंग S९ आणि S९ प्लस ६२,५०० रुपये किंमतीचा S९ स्मार्टफोन २९,९९९ रुपयात आणि ७० हजार रुपयांचा S९ प्लस ३४,९९९ रुपयात उपलब्ध आहे. प्रीपेड ऑर्डर केल्यास S९ वर १००० रुपये अतिरिक्त सूट मिळेल. याशिवाय एचडीएफसी डेबिट कार्डने पेमेंट केल्यास दोन्ही स्मार्टफोनवर १० टक्के कॅशबॅक ऑफर आहे. सॅमसंग A५० मोबाईल फेस्टिव्ह ऑफरनुसार २१ हजार रुपये किंमतीचा हा स्मार्टफोन १६ हजार ९९९ रुपयात उपलब्ध आहे. प्रीपेड ऑर्डर केल्यास दोन हजार रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. एचडीएफसी डेबिट कार्ड धारकांना १० टक्के कॅशबॅक मिळेल. पोको एफ१ पोको एफ १ चा ४ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट १५,९९९ रुपये आणि ८ जीबी रॅम+२५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंट १८,९९९ रुपयात उपलब्ध आहे. प्रीपेड ऑर्डर केल्यास एक हजार रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. रेडमी ७ प्रो १५,९९९ रुपये किमतीचा हा स्मार्टफोन ११,९९९ रुपयात मिळत आहे. प्रीपेड ऑर्डर केल्यास एक हजार रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. म्हणजेच हा स्मार्टफोन तुम्हाला १०.९९९ रुपयात खरेदी करता येईल. सोबतच सहा महिन्यांसाठी यूट्यूब प्रीमिअमही मिळेल. रेडमी गो शाओमीचा हा सर्वात स्वस्त फोन सेलमध्ये ४२९९ रुपयात उपलब्ध आहे. तर याची मूळ किंमत ५९९९ रुपये आहे. एचडीएफसी डेबिट कार्डधारकांना १० टक्के कॅशबॅक मिळेल, शिवाय सहा महिन्यांसाठी यूट्यूब प्रीमिअमही मिळेल. आणखी कोणकोणत्या स्मार्टफोनवर सूट? रियलमी सी 3, VIVO Z1 प्रो, मोटो E6S, असुस 6 Z आणि लेनेवो A6 नोट यांसारख्या स्मार्टफोनवरही भरघोस ऑफरचा लाभ घेता येईल. आयफोनवरही भरघोस सूट आयफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठीही भरघोस ऑफर्स आहेत. प्रीपेड ऑर्डरवर अतिरिक्त सूट, कॅशबॅक आणि नो-कॉस्ट ईएमआय यांसारख्या ऑफर मिळतील.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2MYE3RS

Comments

clue frame