टेलिकॉम इंडस्ट्रीत खळबळ उडवून देणाऱ्या रिलायन्स जिओनं अचानक आउटगोईंग कॉलसाठी पैसे मोजावे लागणार असल्याची घोषणा केलीय. या घोषणेमुळे जिओच्या ग्राहकांमध्ये खळबळ उडालीय.
रिलायन्स जिओची आउटगोईंग सेवा आता सशुल्क होणाराय. ग्राहकांनी अन्य नेटवर्कवर कॉल केल्यास त्यासाठी दर मिनिटाला 6 पैसे शुल्क आकारलं जाईल. ग्राहकांना जिओ ते जिओ सेवा मोफत असेल. तसंच जिओ ते लँडलाईन कॉलसाठीही पैसे मोजावे लागणार नाहीत. जिओच्या नेटवर्कवरून व्हॉट्सअॅऍप आणि इनकमिंग कॉलही मोफत असतील.
All you need to know about IUC. pic.twitter.com/svdSsrmT5s
— Reliance Jio (@reliancejio) October 9, 2019
जिओच्या ग्राहकांना अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी वेगळं आययूसी टॉपअप करावं लागेल आणि या निर्णयाची अंमलबजावणी तडकाफडकी म्हणजे गुरुवारपासूनच होणाराय. ही निर्णय पोस्टपेड सेवेसाठीही लागू आहे.
ग्राहकांसाठी जिओनं वेगवेगळे पर्याय दिले आहेत. मात्र, येत्या काळात मोबाईल क्षेत्रात आणखी काही घडामोडी दिसल्या तर आश्चर्य वाटायला नको.
WebTitle : Jio customers will have to pay 6 paisa per min for calling to other companies customers

from News Story Feeds https://ift.tt/2VqUb0Z
Comments
Post a Comment