नोकियाचा नवा फोन लाँच, २७ तास गाणं ऐका

नवी दिल्लीः एमएचडी ग्लोबलने ब्रँडच्या अंतर्गत नोकिया ११० २०१९ (2019) फीचर फोन लाँच केला आहे. या फोनचे वैशिष्ट्ये म्हणजे या मोबाइलवर २७ तासांपर्यंत गाणे ऐकता येऊ शकणार आहेत. या फोनमध्ये एफएम रोडिओ सोबत अनेकांचा आवडता सापाचा गेम सुद्धा देण्यात आला आहे. भारतात नोकिया ११० या फोनची किंमत फक्त १ हजार ५९९ रुपये इतकी आहे. हा फोन ब्लॅक, ओशियन ब्लू आणि पिंक कलरमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. या फोनची विक्री नोकियाची वेबसाइट आणि ऑफलाइन म्हणजेच मोबाइलच्या दुकानात सुरू करण्यात आली आहे. या फोनमध्ये १.७७ इंचाचा क्यूक्यूव्हीजीए डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच यात एसपीआरडी ६५३१ई प्रोसेसर आणि ५ एमबी रॅम देण्यात आला आहे. यात ४ एमबी स्टोरेज सुद्धा आहे. तसेच यात मायक्रो यूएसबी २.० पोर्ट देण्यात आला आहे. या फोनमध्ये ड्युअल सीम सपोर्ट आहे. तसेच मेमरी कार्डच्या साहाय्याने एक वेगळे स्लॉट देण्यात आला आहे. हा फोन ३२ जीबी पर्यंत मेमरी कार्डला सपोर्ट करीत आहे. यात ८०० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनवरून १४ तासा पर्यंत टॉक टाइम करू शकतो, असा कंपनीने दावा केला आहे. तसेच २७ तासांपर्यंत एमपी३ प्लेबॅक आणि १८ तास रेडिओ प्लेबॅक करू शकतो, असा कंपनीने दावा केला आहे. यात रियर कॅमेरा सुद्धा देण्यात आला आहे. या फोनमध्ये फ्लॅश लाइट ही देण्यात आला आहे. फोनमध्ये सापाचा प्रसिद्ध गेम इनबिल्ट करण्यात आला आहे. तसेच गेम खरेदी करण्याचा पर्याय सुद्धा देण्यात आला आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2IXS3sx

Comments

clue frame