'गुगल पिक्सेल ४'ची किंंमत लीक

मुंबई: ॲपल,सॅमसंग, वनप्लस आणि हुआवे यां सारख्या मोबाइल कंपन्यांनी त्यांचे अपडेटेड फोन बाजारात लॉन्च केले आहेत. काही दिवसांपूर्वी ॲपलनं 'आयफोन ११' लॉन्च केला होता. आता गुगलही त्यांच्या फ्लॅगशिप स्मार्टफोन ' ४' हा लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. येत्या १५ ऑक्टोबरला ' पिक्सेल ४' आणि 'गुगल पिक्सेल ४ एक्स एल' हा फोन लॉन्च होणार आहे. असं असलं तरी या फोनची माहिती इंटरनेटवर लीक झाली आहे. या स्मार्टफोनचे फोटो आणि किंमती सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. अनेक फेसबुक पेजवर ही माहिती शेअर केली जात आहे. व्हायरल झालेल्या या फोटोत 'गुगल पिक्सेल ४' या फोनमध्ये काही बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. 'गुगल पिक्सेल ४' या स्मार्टफोनच्या रिअर पॅनेलवर बदल करण्यात केल्याचं पाहायला मिळत आहे. या फोन दोन कॅमेरे दिसून येत असून या फोनच्या बाजूला बेजल्सही असल्याचं दिसून येत आहे. तसंच 'गुगल पिक्सेल ४' मध्ये एका बाजुला सेल्फी कॅमेरा आणि इअरपीस देण्यात आले आहेत. फिंगरप्रिंट लॉक आणि फेस अनलॉक हे फीचर्य 'गुगल पिक्सेल ४' या फोनमध्ये असण्याची शक्यता आहे. या फोनची अनेक वैशिष्ट्ये असून सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्ये म्हणजे हा फोन मोशन सेन्स या तंत्रज्ञानासह येत असल्याची चर्चा आहे. यासाठी 'गुगल पिक्सेल ४' मध्ये काही विशिष्ठ सेन्सरही देण्यात आले आहेत. या तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं फोनला हात लावायची गरज नसणार आहे. फोनला हात न लावताही केवळ तुमच्या हावभावावरून स्मार्टफोन ऑपरेट करता येणार आहे. 'गुगल पिक्सेल ४' आणि 'गुगल पिक्सेल ४ एक्स एल' हे स्मार्ट फोन ६४ जीबी स्टोरेज आणि १२८ जीबी स्टोरेज इतक्या मेमरीसह येण्याची शक्यता आहे. 'गुगल पिक्सेल ४च्या' ६४ जीबी असलेल्या फोनची किंमत ५६ हजार असू शकते. तर याच फोनच्या १२८ जीबीच्या वेरियंटची किंमत ही ६४,००० असू शकते. तर गुगल पिक्सेल ४ एक्स एल' हा फोनची १२८ जीबी वेरियंट असलेल्या स्मार्टफोनची किंमत ७२, ००० रुपये इतकी असणार आहे अशी चर्चा आहे. मे महिन्यात गुगलनं 'पिक्सल ३ ए' आणि 'पिक्सल ३ ए एक्सएल' लाँच केले होते. त्यानंतर युजर्स पुढचा स्मार्टफोन लॉन्चच्या प्रतिक्षेत होते. त्यामुळं 'गुगल पिक्सेल ४' आणि 'गुगल पिक्सेल ४ एक्स एल' च्या लॉन्च नंतरच या फोनचे फीचर्स आणि किंमत समोर येईल.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33b0vfH

Comments

clue frame