फेसबुक युजर्ससाठी लवकरच डार्कमोड फीचर

सर्वात जास्त वापरण्यात येत असलेली वेबसाइट म्हणजे 'फेसबुक'. फेसबुक त्यांच्या युजर्ससाठी नेहमीच काही तरी नवीन अपडेट्स आणण्याच्या तयारीत असतं. असंच एक फीचर लवकरच फेसबुक युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे. ते फिचर म्हणजे 'डार्क मोड'. फेसबुकवर लवकरच डार्क मोड हे फिचर येणार असून काही युजर्सनं हे फीचर वापरल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक युजर्सनं त्यांच्या फेसबुक वेबचे स्क्रिनशॉट्स काढून शेअर केले आहेत. या फीचरमध्ये मोठा फॉन्ट आणि साधं लेआउट अशी मांडणी असेल. जर एखादा युजर न्यूजफीडने नेविगेट करत असेल तर त्याला पुन्हा त्याच पोस्ट दिसणार आहेत जिथून त्यानं नेविगेट करायला सुरुवात केली होती. आतापर्यंत न्यूजफिड बॅक केल्यानंतर रिफ्रेश होत असे. मेसेंजर डार्क मोडमध्ये फेसबुक मेसेंजरसाठी डार्क मोड अॅक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला चॅट लिस्टमधील एका व्यक्तीला 'crescent moon' अर्थात अर्धचंद्राची इमोजी पाठवावी लागेल. त्यानंतर तुमच्या मेसेंजरमध्ये Dark Mode फीचर उपलब्ध आहे असं लिहून येईल आणि डार्क मोड सुरू होईल. Dark Mode ऑन करण्यासाठी... > फेसबुक मेसेंजरवर क्लिक करा > कोणत्याही एका चॅटबॉक्समध्ये जा >'crescent moon'इमोजी सेंड करा >सेटिंग्समध्ये जाऊन Dark Mode ऑप्शन शोधा > हा Dark Mode ऑप्शन ऑन करा फेसबुक मेसेंजरवरील हा ऑप्शन तुम्ही ऑन केल्यावर लगेच तुमची मेसेंजर स्क्रीन तुम्हाला डार्क मोडमध्ये दिसेल. अर्थात त्याचे बॅकग्राउंड काळ्या रंगात दिसायला लागेल.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2MXSt3g

Comments

clue frame