टिक टॉकला टक्कर देणार गुगलचं हे अॅप

नवी दिल्लीः भारतात टिक-टॉकची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत टिकटॉकची क्रेझ दिसून येतेय. टिकटॉकचा वाढता वापर इतर मोठ्या कंपन्यांसाठी डोकेदुखी ठरला आहे. फेसबुकनंतर गुगलही टिकटॉकला मात देण्यासाठी नवीन अॅप लाँच करण्याच्या तयारीत आहे. स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, अमेरिकेतील लोकप्रिय सोशल व्हिडिओ शेअरिंग अॅप 'फायरवर्क' खरेदी करण्याच्या प्रयत्नात आहेत. चीनची कंपनीसुद्धा खरेदीच्या विचारात गुगलबरोबरच चीनची मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट Weiboसुद्धा फायरवर्क खरेदी करण्याच्या विचारात आहेत. मात्र, फायरवर्क खरेदी करण्याच्या शर्यतीत गुगल इतर कंपन्यांच्या पुढे आहे. टिकटॉकपेक्षा अधिक आहे फायरवर्कची किंमत मागच्याच महिन्यात फायरवर्कनं भारतात एन्ट्री केली आहे. फायरवर्कला या वर्षाच्या सुरूवातीला १०० मिलियन डॉलर नफा प्राप्त झाला आहे. तर, टिकटॉकची सहयोगी कंपनी बाइटडान्सनं ७५ मिलियन डॉलर आहे. टिकटॉकपेक्षा वेगळं शॉर्ट व्हिडिओ मोकिंग आणि शेअरिंगसाठी असलेले हे अॅप टिकटॉकपेक्षा वेगळं आहे. फायरवर्क युजर्स ३० सेकंदाचा व्हिडिओ बनवू शकतो. टिकटॉकमध्ये फक्त १५ सेकंदापर्यंत व्हिडिओ बनवता येऊ शकतो. तसंच, युजर्स व्हर्टिकल व्हिडिओसोबतच हॉरिजॉन्टल व्हिडिओसुद्धा शूट करू शकतो. फायरवर्क अॅप अँड्रोइड आणि आयओएस युजर्ससाठी उपलब्ध आहे. हे अॅप वापरणाऱ्या युजर्सची संख्या १०लाखांपेक्षा अधिक आहे. भारतातही फायरवर्क अॅपला चांगला प्रतिसाद मिळेल असा दावा कंपनीनं केला आहे. फेसबुकचंही व्हिडिओ शेअरिंग अॅप सोशल मीडिया कंपनी फेसबुकसुद्धा युजर्समध्ये शॉर्ट व्हिडिओ मेकिंगची वाढलेली क्रेझ पाहून एक नवीन अॅप लाँच केले आहे. मागच्य वर्षी नोव्हेंबर महिन्यात lasso नावाचं एक अॅप फेसबुकनं लाँच केले आहे. फेसबुकचं हे लेटेस्ट अॅप सध्यातरी फक्त अमेरिकेतच उपलब्ध आहे. टिकटॉकसारखेच या अॅपचेदेखील फिचर आहेत. दरम्यान, भारतात टिक टॉक अॅपचा गैरवापर करण्यात येत आहे. टिक टॉक अॅपमध्ये अश्लिल मजकूर अपलोड करण्यात येत असल्याने या अॅपवर तात्काळ बंदी आणावी, अशी मागणी करण्यात आली होती. टिक टॉकचे १२ कोटी यूजर्स असून बंदीनंतर या अॅपवरील सुमारे ६० लाख व्हिडिओ डिलिट करण्यात आले होते. बंदीमुळे २५० नोकऱ्याही धोक्यात आल्या होत्या. मात्र, कालांतराने न्यायालयाने टिक टॉकवरील बंदी मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2AO3GOk

Comments

clue frame