नवी दिल्ली: गेल्या काही वर्षांत वेअरेबल्सची बाजारपेठ वेगाने बदलली आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने पोशाखात आमूलाग्र बदल होत आहेत. असंच एक नवं तंत्रज्ञान येऊ घातलं आहे. हा नवा आविष्कार म्हणजे एक खास शर्ट आहे. त्याचं नाव '' असं ठेवण्यात आलं आहे. या शर्टमध्ये १६ सेन्सर आहेत, जे शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये विशिष्ट ध्वनिलहरी निर्माण करतात आणि शरीरात संगीत वादनाची संवेदना चेतवतात. याद्वारे वाजणाऱ्या संगीताचा अनुभव संपूर्ण शरीराला करून देतात. यामुळे ज्यांना ऐकू येत नाही अशा दिव्यांगांना संगीताची भावना जाणवते. हे हाय टेक साऊंड शर्ट एका कॉम्प्युटरला जोडलेलं आहे, जे स्टेजच्या सभोवताली लावलेल्या मायक्रोफोनमधून ध्वनिलहरी ट्रान्समिट करते. अशा प्रकारे, ज्यांची श्रवणशक्ती कमी आहे ते शर्ट घालून मैफिली किंवा संगीत कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकतात. लंडनमधील CuteCircuit या कंपनीने हा ध्वनी शर्ट विकसित केला आहे. कंपनीने केटी पेरीसारख्या सेलिब्रिटींच्या म्युझिक इव्हेंटसाठी आउटफिट्स डिझाइन केले आहेत. कंपनीने सांगितले, 'साऊंड शर्टच्या सहाय्याने व्यक्ती आपल्या त्वचेवर संगीत अनुभवू शकेल आणि पहिल्यांदाच तिला हा शर्ट परिधान केल्यावर लाइव्ह मैफलीसारखा अनुभव मिळेल.' कंपनीद्वारे सांगण्यात आलं आहे की, 'प्रथमच एखाद्या कर्णबधीर व्यक्तीला प्रेक्षकांमध्ये बसून एखाद्या लाइव्ह कॉन्सर्टचा आनंद घेता येणार आहे.' असे काम करते हे शर्ट ध्वनी शर्ट बर्याच टप्प्यात कार्य करते. सर्वात आधी त्याला जोडलेली संगणक प्रणाली मायक्रोफोन्सच्या मदतीने स्टेजच्या वेगवेगळ्या भागांवरील ध्वनी रेकॉर्ड करते. त्यानंतर, वेगवेगळ्या पोझिशन्सवर बसविलेले १६ सेन्सर्स वायरलेस डेटा गोळा करतात आणि प्रसारित करतात. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रायन जेंज यांनी 'फॉर्च्युन'ला सांगितले, वायरिंग नाही साउंड शर्ट त्वचेसाठी आरामदायक बनविण्यात आलं आहे आणि त्यामध्ये तारा किंवा कोणत्याही प्रकारच्या वायर्स नाहीत. 'सॉफ्ट स्ट्रेच फॅब्रिक' ने बनविलेले हे शर्ट परिधान केल्यानंतर, जेव्हा कर्णबधीर कॉन्सर्ट पहात असतात, तेव्हा उलट त्यांचे अवयव उर्वरित लोकांपेक्षा अधिक सक्रिय असतात. शर्टमधून निघणाऱ्या संवेदना त्यांच्या शरीरात ध्वनी लहरींसारख्या काम करतात आणि संगीताची भावना येते. क्यूटसर्किटचे सह-संस्थापक आणि मुख्य क्रिएटिव्ह अधिकारी फ्रान्सिस्का रोझेला म्हणाल्या, 'शर्टच्या आत किंवा कोणत्याही भागात कुठल्याच वायरी लावलेल्या नाहीत. आम्ही यासाठी केवळ स्मार्ट फॅब्रिक वापरत आहोत. हे सेन्सर्स कनेक्ट करण्यासाठी मायक्रोइलेक्ट्रॉनिक्सचा वापरत करण्यात आला आहे. इतकी असेल किंमत साउंड शर्टचे हे तंत्रज्ञान अद्याप खूप महाग आहे. विक्रीसाठी साऊंड शर्टची किंमत ३,६७३ डॉलर्सपेक्षा अधिक असू शकते. पण कंपनीचा दावा आहे की कर्णबधीरांना संगीताच्या आनंदापर्यंत पोहोचवताना ही किंमत जास्त नाही.
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2MGhHDk
Comments
Post a Comment