मुंबई: ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेज सेल नुकताच संपतोय न संपतो तोच कंपनीने पुढील सेलची तयारी देखील सुरू केली. फ्लिपकार्टचा 2019 येतोय. वॉलमार्टची मालकी असलेल्या फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये स्मार्टफोन्सव्यतिरिक्त टीव्ही, इलेक्ट्रोनिक वस्तूंवर मोठी सवलत मिळणार आहे. जुन्या सेलप्रमाणे हा सेलही प्लसच्या मेंबर्ससाठी लवकर सुरू होणार आहे. १२ ऑक्टोबरपासून सुरू होणारा हा सेल फ्लिपकार्ट प्लस मेंबर्ससाठी ११ ऑक्टोबर रात्री ८ वाजताच सुरू होणार आहे. अन्य युजर्ससाठी तो १२ ऑक्टोबर रात्री १२ वाजता सुरू होणार आहे. सेलमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना १० टक्के इस्टंट डिस्काउंट मिळणार आहे. यासाठी फ्लिपकार्ट स्टेट बँक ऑफ इंडियाशी करार केला आहे. याव्यतिरिक्त ग्राहकांना नो कॉस्ट EMI, एक्स्चेंज ऑफरसह डिस्काउंटवर मोबाइल प्रोटेक्शन प्लान सारख्या सुविधा मिळणार आहेत. मोठ्या ब्रँडच्या स्मार्टफोन्सवर मोठी सूट फ्लिपकार्टनुसार, सेलमध्ये रेड मी नोट ७, रेड मी नोट ७ एस, रिअल मी ५, विवो Z1 प्रो आणि रिअलमी सी २ सह अनेक स्मार्टफोन्सवर सवलत मिळणार आहे. याव्यतिरिक्त ग्राहकांना बाय बॅक गॅरंटी देखील मिळणार आहे. मोबाइल फोनव्यतिरक्त टीव्ही आणि अप्लायन्स कॅटेगरीत सुमारे ५० हजारहून अधिक प्रोडक्टवर ७५ टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाईल. इलेक्ट्रॉनिक्स विभागात अनेक वस्तूंवर सुमारे ९० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. यात हेडफोन्स, स्पीकर, लॅपटॉप आणि कॅमेऱ्याव्यतिरिक्त स्मार्टवॉच सारख्या वस्तूंचा समावेश आले. फ्लिपकार्टच्या या बिग दिवाळी सेलमध्ये 'धमाका डिल्स' नावाचा एक फ्लॅश सेल देखील आयोजित केला जाणार आहे. या फ्लॅश सेलमध्ये १२ am, ८am आणि ४ pm ला मोबाइल फोन्स, टीव्ही आणि अन्य इलेक्ट्रॉनिक्स सामानावर अतिरिक्त सवलत दिली जाणार आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31QwDFe
Comments
Post a Comment