थंडी में गर्मी का अहसास... शाओमीचं इलेक्ट्रिक ब्लॅंकेट लाँच

मुंबई: चिनची प्रसिद्ध कंपनी शाओमीनं अनेक उत्पादने बाजारात लॉन्च केली आहेत. नुकत्याच लॉन्च झालेल्या इलेक्ट्रिक ब्लॅंकेटची बाजारात बरीच चर्चा आहे. यापूर्वी कंपनीनं इलेक्ट्रिक हिटर आणि चटई यांसारखे प्रोडक्ट लॉन्च केले आहेत. तसंच कंपनीच्या हीटडे जॅकेट्सचीही चर्चा आहे. या इलेक्ट्रिक जॅकेटची निर्मिती करताना ग्राहकांच्या सुरक्षेचा पूर्ण विचार करण्यात आला आहे. कमीत कमी डिझानचा वापर करण्यात आल्यानं हे ब्लॅंकेट दिसायला अगदी साधं असणार आहे, हे ब्लॅंकेट ग्रॅफीन आणि इलेक्ट्रिक हीटींग वायर व्हर्जनमध्ये असणार आहे. २४ वोल्ट पावरमुळं हे वापरण्यासाठी अगदी सुरक्षित असं आहे. याची वोल्टींग रेटिंग ३६ वोल्टपेक्षा कमी आहे. शाओमीच्या या इलेक्ट्रिक ब्लॅंकेटमध्ये खास स्लिप मोड हे फीचर देण्यात आलं आहे. ब्लॅंकेट आणि युजरच्या शरिराचं तापमान एका विशिष्ट पातळीपर्यंत कंट्रोल करतं. हे ब्लॅंकेट दोन वेगवेगळ्या साइजमध्ये उपलब्ध आहे. सिंगल मॉडेलचं माप ८०*१५० असं आहे तर, डबर ब्लॅंकेटची साइज १५०*१७० सेमी आहे. ब्लॅंकेटला व्हॉइज असिस्टेंटनं कंट्रोल केलं जातं. हे ब्लॅंकेट कंट्रोल करण्यासाठी तुम्ही MIJIA हे अॅप देखील वापरू शकता. त्यामुळं तुम्हाला कुठूनही हे अॅप ऑपरेट करता येणार आहे. सध्या तरी हे ब्लॅंकेट केवळ चीनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2N3H02i

Comments

clue frame