ग्रुपमध्ये अॅड होण्यासाठी व्हॉट्सअॅप युजर्सना येणार इन्व्हाइट

नवी दिल्ली: मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपवर यूजर्सना एक नवा अपडेट मिळाला आहे. या फिचरची सर्वजण खूप काळापासून वाट पाहत होते. कोणीही उठतं आणि कुठला तरी ग्रुप तयार करून आपल्याला अॅड करतं. नंतर त्यातून एक्झिट होण्याचा आपल्याला पर्याय असतो खरा, पण हे नवेनवे ग्रुप कधीकधी बेजार करून टाकतात. आता कोणालाही तुम्हाला तुमच्या परवानगीशिवाय ग्रुपमध्ये अॅड करता येणार नाही. अँड्रॉइड आणि iOS यूजर्स दोहोंसाठी ही प्रायव्हसी सेटिंग आली आहे. फॉर iOS मध्ये 2.19.110.20 आणि व्हॉट्सअॅप फॉर अँड्रॉइड बीटा मध्ये 2.19.298 मध्ये ही नवी प्रायव्हसी सेटिंग मिळत आहे. आपल्याला ग्रुपमध्ये कोण अॅड करू शकते ते आता व्हॉट्स अॅप यूजर्स सिलेक्ट करू शकणार आहेत. यूजर्सना ग्रुपमध्ये अॅड करण्यासाठी परमिशन देणारे तीन पर्याय मिळतात - Everyone, My आणि My Contacts Except. आता ग्रुप अॅडमिन्स जर यूजर्सना ग्रुपमध्ये थेट अॅड करू शकत नसतील तर त्यांना इन्व्हाइट पाठवण्याचा पर्याय मिळेल. हे इन्व्हाइट स्वीकारलंत तरच तुम्ही कोणत्याही ग्रुपचा भाग बनू शकाल. हे फिचर आतापर्यंत व्हॉट्सअॅप बीटा फॉर अँड्रॉइडवर दिसत नाहीए आणि आता अँड्रॉइड यूजर्ससाठीदेखील याची चाचणी सुरू आहे. अशी बदला सेटिंग्ज मेसेजिंग अॅपवर मिळणाऱ्या नव्या ग्रुप इन्व्हिटेशन फिचरसाठी व्हॉट्सअॅपच्या अँड्रॉइड क्लायंटमध्ये जायला हवं. आता सेटिंग्स> अकाउंट > प्रायव्हसी > ग्रुप्समध्ये जाऊन यात बदल करण्याचा पर्याय मिळेल. या ग्रुपच्या सब-सेक्शनमध्ये यूजर्सला तीन इन्व्हिटेशन कंट्रोल ऑप्शन Everyone, My Contacts आणि My Contacts Except मिळणार. अशा प्रकारे यूजर्स स्वत: ठरवू शकतात की त्यांनी कोणत्याही गटात अॅड होण्याचा पर्याय स्वीकारायचा की नाही. लवकरच स्टेबल अपडेट प्रायव्हसी सेटिंगमध्ये Everyone हा पर्याय दिला असेल तर कोणतंही कॉन्टॅक्ट यूजरला ग्रुपमध्ये अॅड करू शकेल. याच प्रकारे My Contacts सेट केल्यानंतर यूजरला त्याच ग्रुपमध्ये अॅड करता येणार ज्यांचे कॉन्टॅक्ट्स त्या यूजरच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये आहे. My Contacts Except सेटिंग सिलेक्ट केल्यावर कॉन्टॅक्ट यूजरला थेट ग्रुपमध्ये अॅड करता येणार नाही, त्यासाठी इन्व्हाइट पाठवू शकाल.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2o7CGqh

Comments

clue frame