'मेड इन इंडिया' आयफोनची विक्री सुरू

मुंबई: आयफोनचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक खास बातमी आहे. 'मेक इन इंडिया'अंतर्गत भारतातच तयार झालेल्या आयफोनची विक्री सुरू झाली आहे. त्यामुळं तुम्हाला लवकरच हा फोन खरेदी करता येणार आहे. काही महिन्यांपूर्वी 'मेक इन इंडिया'अंतर्गत भारतात आयफोनची निर्मिती होणार असल्याचं अॅपल कंपनीकडून सांगण्यात आलं होतं. मात्र, हे फोन खरेदीसाठी केव्हा उपलब्ध होणार याबद्दल काही माहिती देण्यात आली नव्हती. 'मेक इन इंडिया' अंतर्गत सध्या 'आयफोन एक्स आर'ची विक्री करण्यात येत आहे. हा कंपनीचा सर्वांत जास्त विकला जाणारा बजेट फोन असून अॅपल स्टोअर आणि इतर मोबाइल दुकांनांमध्ये अॅपलचा 'आयफोन एक्स आर' हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असल्याचं पाहायला मिळालं आहे. या फोनची किंमत ४९,००० इतकी आहे. ७६,००० रुपयांना झाला होता लॉन्च'आयफोन एक्स आर' लॉन्च करण्यात आला तेव्हा त्याची किंमत ७६,००० रुपये इतकी होती. त्यानंतर अनेकदा या फोनची किंमत कमी करण्यात आली. अॅमझॉनच्या सेलमध्ये हा फोन ३९,००० रुपयांना देखील उपलब्ध होता.भारतात आतापर्यंत आयफोनची आयात केली जात होती. यावर २० टक्के आयात शुल्क आकारलं जातं. यामुळं फोनची किंमत वाढते. पण जेव्हा हे फोन इथंच तयार होतात तेव्हा त्याची किंमत कमी होते. भारतात स्मार्टफोनची जगातील सर्वात मोठी दुसरी बाजारपेठ आहे. मात्र, किंमत जास्त असल्यानं आयफोन त्या तुलनेत कमी विक्री होतो. ची वैशिष्ट्ये:>> ६.१ इंचाचा एलसीडी डिस्प्ले, रिझॉल्यूशन (१२९२X८२८) >> १२ मेगापिक्सलचा सिंगल रिअर कॅमेरा >> स्मार्ट एचडीआर, डेप्थ कंट्रोल, पोर्ट्रेट मोड फीचर्स >> आयफोन एक्सआर ६४ जीबी, २५६ जीबी, ५१२ इनबिल्ट स्टोरेज >> ड्युअल सिम आणि ब्लूटूथ ५.० फीचर्स >> ६४ जीबी, १२८ जीबी आणि २५६ जीबीचा पर्याय >> पांढरा, काळा, पिवळा, लाल, कोरल या रंगात उपलब्ध तैवानच्या 'फॉक्सकॉन' या स्मार्टफोन उत्पादक कंपनीतर्फे आयफोनचं उत्पादन करण्यात येत आहे. 'फॉक्सकॉन'ने चेन्नईत १६० एकर जागा ताब्यात घेतली असून, या प्रकल्पात ' 'च्या विविध श्रेणीतील स्मार्टफोनची निर्मिती करण्यात येणार आहेत. आगामी काळात कंपनी उत्पादनक्षमता वाढवण्याचा आणि अन्य मॉडेलची निर्मिती करण्याचा निर्णय घेणार आहे.' उत्पादन क्षमता वाढविण्याचा निर्णय सर्वस्वी आगामी सरकारच्या धोरणांवर आणि प्रोत्साहनावर अवलंबून असल्याचं 'फॉक्सकॉन'तर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे. यामुळं भारतीय बाजारपेठेतील आपलं स्थान अधिक पक्क करण्यास अॅपलला मदत होणार आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32F285u

Comments

clue frame