रिलायन्स जिओच्या युजर्सना सायबर हल्ल्याचा धोका?

नवी दिल्ली: रिलायन्स जिओच्या यूजर्ससाठी एक सावध करणारी बातमी आहे. सायबर सिक्युरिटी फर्म सिमँटेकने एक मेलवेअर सोर्स कोडच्या शोध लावला आहे. हॅकर्स हा मेलवेअर रिलायन्स जिओच्या यूजर्सवर सायबर हल्ला करण्यासाठी तयार करत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नावाचा हा मेलवेअर फोनमध्ये लपलेला असतो आणि अन्य मॅलिशिअस अॅप डाऊनलोड करतो किंवा जाहिरात दाखवतो. कंपनीने त्यांच्या अधिकृत ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलंय, 'आम्ही अनेक क्लासेस आणि कॉन्स्टंट वेरिएबल्स पाहिले आहेत, ज्यांना जिओच्या स्वरुपात लेबल केलं गेलं आहे. आम्हाला शंका आहे की अटॅकर्स भविष्यात जिओ यूजर्सना टारगेट करण्याची योजना आखत आहेत.' एक्सहेल्पर तुमच्या फोनमध्ये अॅपच्या स्वरुपात डाऊनलोड होतो आणि नंतर आपणहून लपून जातो. हा अॅप ऑफिशिअल गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध नाही, पण थर्ड पार्ट अॅप स्टोअर आणि अन्य सोर्सवर याला पाहिलं गेलं आहे. यूजर्सना रँडम अॅप्स आणि अज्ञात एपीके फाइल्स इन्स्टॉल न करण्याचा सल्ला दिला जात आहे. विशेष म्हणजे हा मेलवेअर अनइन्स्टॉल केल्यावर पुन्हा आपोआप तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल होतो. डेव्हलपर्सने याला अशाप्रकारे बनवलंय की हा हिडन अॅप प्रमाणे कार्यरत राहातो. सिक्युरिटी फर्म सिमेंटेकचा दावा आहे की गेल्या ६ महिन्यापासून या मेलवेअरने ४५ हजारहून जास्त अँड्रॉइड डिव्हायसेसना प्रभावित केलं आहे. कसा करतो हा मेलवेअर हॅक सिमेंटेकने म्हटलंय की एक्सहेल्पर मेलवेअर फोनमध्ये आल्यानंतर मेमरी डिक्रिप्ट करून आपलं काम सुरू करतो. या मेलवेअर पॅकेजमध्ये मॅलिशिअस पेलोड एम्बेड केला गेला आहे. मेमरी डिक्रिप्ट केल्यानंतर पेलोड अटॅकर्सच्या सूचना आणि कंट्रोल सर्व्हसशी कनेक्ट होतो आणि कमांड मिळण्याची वाट पाहतो.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2PzP0e4

Comments

clue frame