शाओमीची 'दिवाळी'; ८५ लाख स्मार्टफोनची विक्री

नवी दिल्लीः स्मार्टफोन बनवणाऱ्या चीनची कंपनीची दिवाळी धमाकेदार झाली आहे. शाओमीने दिवाळीत आणलेल्या 'बंपर सेल'मध्ये बंपर विक्री केली आहे. केवळ दिवाळीत शाओमीनं तब्बल ८५ लाख स्मार्टफोनची विक्री केली आहे. शाओमीने अवघ्या दोन दिवसात १२ मिलियन म्हणजेच १.२ कोटी उत्पादनाची विक्री केली आहे. शाओमीच्या मनु कुमार जैन यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ही माहिती दिली आहे. मनु कुमार जैन यांच्या ट्विटच्या माहितीनुसार, कंपनीने ८.५ मिलियन (८५ लाख) स्मार्टफोन आणि सहा लाखांहून अधिक एमआय टीव्हीची विक्री केली आहे. तर दुसरीकडे शाओमीने तीन मिनिटांच्या अंतरात सर्व इकोसिस्टम विक्री केले आहेत. तसेच कंपनीच्या सेलमध्ये ४० टक्के विक्री अधिक झाल्याचीही माहिती समोर आली आहे. शाओमीला भारतात भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर कंपनीने भारतीय ग्राहकांचे आभार मानले आहे. शाओमीने सप्टेंबर महिन्यात सुरुवातीला पाच लाख टीव्हीची विक्री करून एक नवीन विक्रम नोंदवला होता. नवरात्रीत सणांमध्ये कंपनीने आतापर्यंत अॅमेझॉन, फ्लिपकार्ट या सारख्या ई-कॉमर्स वेबसाइट आणि किरकोळ दुकान विक्रीतून आपल्या टीव्हीची विक्री केली आहे. सप्टेंबर महिन्यात अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट वर सर्वात जास्त टीव्हीची विक्री झाली आहे. शाओमीने गेल्या वर्षी भारतीय बाजारात आपला स्मार्ट टीव्ही लाँच केला होता. शाओमीच्या इंडिया कॅटेगरी लीड (टीव्ही) ईश्वर नीलाकंत यांनी म्हटले की, सर्वात कमी कालावधीत हा देशाचा पहिला ब्रँड बनला आहे. एका वर्षापूर्वी हा ब्रँड लाँच करण्यात आला होता. लाँच झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यात शाओमी पहिल्या स्थानावर पोहोचला होता. तसेच लागोपाठ पाच महिन्यांपर्यंत अव्वल स्थानावर तो कायम राहिला. अॅमेझॉन ग्रेट इंडियन सेलने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. कंपनीने वन प्लस, सॅमसंग आणि अॅपल या सारख्या प्रीमियम ब्रँडचे मोबाइलची विक्री केली होती. याआधी सामान आणि टीव्हीच्या विक्रीत पहिल्या ३६ तासात दहा पट नफा झाला होता. तसेच सर्वसाधारण (दैनंदिन) दिवसात फॅशनमध्ये पाच पट, सौंदर्य उत्पादनात सात पट, किरकोळ सामान विक्रीत ३.५ पट वाढ झाल्याचे दिसले. हे सर्व खरेदी करणाऱ्या ग्राहकांत अर्धे ग्राहक हे छोट्या शहरातील होते. पहिल्या ३६ तासांत जवळपास ४२ हजार ५०० विक्रेत्यांनी कमीत कमी एक ऑर्डर करणे गरजेचे होते, असेही यात म्हटले आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/34etnUP

Comments

clue frame