शाओमीचे जॅकेट; -१२० तापमानातही करणार रक्षण

नवी दिल्ली: लवकरच हिवाळ्याचे आगमन होणार आहे. या ऋतुच्या सुरुवातीलाच हिवाळ्यासाठी वापरायये खास कपडे आणि जॅकेटची मोठी खरेदी केली जाते. या हिवाळ्यात खरेदी करताना तुम्हाला बाजारात विशेष जॅकेट खरेदी करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. ऋतु डोळ्यासमोर ठेवून शाओमीने हिटेड गूज डाउन जॅकेट लाँच केले होते. आता याच खास जॅकेटचा सेल लागणार आहे. हे जॅकेट पृथ्वीच्या कोणत्याही कोपऱ्यात थंडीपासून करेल संरक्षण हे जॅकेट उणे १२० डिग्री सेल्सियसमध्ये देखील तुम्हाला थंडीपासून वाचवेल, असे कंपनीचा दावा आहे. पृथ्वीवर अशी कोणतीही जागा उपलब्ध नाही, जिथे उणे १२० डिग्री सेल्सियस इतकी थंडी पडते. अंटार्टिका क्षेत्रात देखील सरासरी तापमान उणे २५ डिग्री सेल्सियस इतके तापमान असते. तापमान नियंत्रण यंत्रणा या स्मार्ट टेंपरेचर कंट्रोल्ड जॅकेटमध्ये ९० टक्क्यांहून अधिक पक्षांच्या फरचा वापर करण्यात आला आहे. या मुळे थंडी आत प्रवेश करणे अशक्य होते. या जॅकेटमुळे व्यक्तीच्या शरीराचे तापमान नियंत्रणात राहते. या जॅकेटबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हे जॅकेट ४ स्पीड मल्टी झोन स्मार्ट टेंपरेचर कंट्रोलनुसार काम करते. पॉवर बँकच्या मदतीने मिळणार उब या जॅकेटमध्ये पॉवर बँक देण्यात आल्याने आतून तापमान आवश्यतेनुसार ठेवता येणार आहे. यामुळे वापरकर्त्याला आपल्याला पाहिजे तितके तापमान ठेवण्याची सोय उपलब्ध झाली आहे. टेंपरेचर कंट्रोल सिस्टममुळे या जॅकेटमध्ये १०,००० mAh इतक्या पॉवर बँकचा पर्याय देण्यात आला आहे. या मुळे जॅकेटमध्ये सात तासांसाठी तापमान नियंत्रित करता येणार आहे. जॅकेट आहे वॉटरप्रूफ जॅकेच्या बाहेरच्या स्तराला वॉटरप्रूफ बनवण्यात आले आहे. यामुळे अंधार असो किंवा पाऊस, वापरकर्त्यांला कोणताही त्रास जाणवणार नाही. या जॅकेटवर रिफ्लेक्टिव्ह स्ट्रिप डिझाइन तयार करण्यात आले आहे. या मुळे रात्रीच्या अंधारातही ती व्यक्ती इतरांना दिसू शकते. जॅकेटची किंमत आहे ४० डॉलर्स फक्त सध्या हे जॅकेट Xiaomi Youpin वर विक्रीसाठी उपलब्ध आहे. या जॅकेटची किंमत २८९ युआन ( सुमारे ४० अमेरिकी डॉलर्स) इतकी आहे. भारतीय रुपयांत या जॅकेटची किंमत आहे ३००० रुपये. मात्र, भारतात या जॅकेटची विक्री कधी होणार याबाबत माहिती उपलब्ध नाही.


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Bi7Wpp

Comments

clue frame