स्मार्टफोन यूजर्स 'बग' समस्येमुळे वैतागले

नवी दिल्ली: गुगलची उत्पादने ही त्रासदायक अॅप आणि व्हायरसची आवडीची ठिकाणे बनली असल्याचे सर्वांनाच माहीत आहे. नुकताच गुगल असिस्टंटमध्ये शिरलेला हे याचे सर्वात ताजे उदाहरण आहे. जगभरातील अनेक अँड्रॉइड यूजर्सनी गुगल असिस्टंटमध्ये शिरलेल्या या बगबाबत तक्रार केली आहे. गुगल असिस्टंट ऑन करण्यासाठी यूजर्सनी 'Hey Google' म्हणताच त्यांची स्क्रीन लगेचच फ्रीझ होते असे जगभरातील अनेक यूजर्सचे म्हणणे आहे. हा बग स्क्रीन फ्रीझ करून स्क्रीन कायम ऑन ठेवण्याचे काम करतो. यामुळे फोनची बॅटरी भराभर रिकामी होत जाते. इतकेच नाही, तर यामुळे मोबाइल फोनचा डिस्प्ले देखील कायमचाच निकामी होण्याचा धोका असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गुगल होम डिव्हाइसवर देखील परिणाम गुगल असिस्टंटशी जोडल्या गेलेल्या स्मार्ट डिव्हायसेसवर जे लोक काम करतात अशा युजर्सना देखील या बगमुळे अतिशय त्रास होत आहे. 'अँड्रॉइ़ड पोलीस' या प्रसिद्ध वेबसाइटलाही या समस्येचा सामना करावा लागला आहे. ही वेबसाइट 'हे गुगल' असे कमांड दिल्यापासून कायम ऑन असल्याचे कर्मचाऱ्यांच्या हवाल्याने अँड्रॉइ़ड पोलीस या वेबसाइटने म्हटले आहे. स्मार्ट डिव्हायसेसशी जोडल्या गेलेल्या युजर्सना या समस्येचा अधिक फटका बसत असल्याचे स्पष्ट झाले आहे. फोनची स्क्रीन राहते कायम ऑन या मुळे फोनच्या बॅटरीसाठीही मोठा धोका निर्माण झाला आहे. गुगल असिस्टंटमध्ये शिरलेला हा बग फोनला कायम ऑन ठेवण्याचे काम करतो. यामुळे फोन लॉक देखील होत नाही. हे गुगल म्हटल्याने स्क्रीन फ्रीझ होत असल्याने युजरला कोणतेही अॅप किंवा फंक्शन वापरता येत नाहीए. गुगलकडून कोणतेही स्पष्टीकरण नाही या बाबत प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, ही समस्या सप्टेंबर महिन्यातच समजली होती. गुगलच्या सपोर्ट फोरमवर काही युजर्सनी याबाबतची तक्रार नोंदवली होती. आता हा बग सर्वात जास्त गुगल पिक्सल स्मार्टफोन्स आणि गुगल होम डिव्हायसेसवर सर्वाधिक हल्ला करत असल्याचे स्पष्ट होत आहे. हा बग नेमका येतो कुठून याबाबत काही माहिती मिळू शकलेली नाही. तर, गुगलने देखील बगबाबत कोणतेही अधिकृत निवेदन दिलेले नाही. याच कारणामुळे ही समस्या नेमकी कधी सुटू शकेल याबाबत सांगणे थोडे कठीणच आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33I3897

Comments

clue frame