नवी दिल्ली: अलीकडे पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यांचं आकर्षण वाढत आहे. हेच ध्यानात ठेवून लिनोवाची मालकी असणारी कंपनी लवकरच आपला पहिला पॉप-अप सेल्फी कॅमेरा असणारा स्मार्टफोन आणणार आहे. कंपनीने अद्याप या फोनसंबंधी कोणतीही घोषणा केलेली नाही. पण या स्मार्ट मोटोची छायाचित्रे मात्र ऑनलाइन लीक झाली आहे. यात पॉप अप सेल्फी कॅमेराही दिसत आहे. या फोनचं नाव काय असेल किंवा कंपनी कोणत्या सीरिजचा हा फोन असेल त्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. सेल्फी कॅमेऱ्याव्यतिरिक्त स्मार्टफोनमध्ये फुल स्क्रीन डिझाइनदेखील पहायला मिळत आहे. कंपनीचा हा पहिला असा फोन असेल ज्यात पॉप-अप सेल्फी कॅमेरा आणि फुल स्क्रीन डिस्प्ले दिलेला असेल. याच्या डिस्प्लेमध्ये कोणत्याही प्रकारचा नॉच किंवा पंच होल दिलेला नाही. फोनमध्ये ग्रेडिअंट फिनिश बॅक पॅनल पाहायला मिळते. फोटो Latinoamerica नावाच्या फेसबुक पेज वर पोस्ट केलेले आहेत. सेल्फी कॅमेरा फोन च्या वरील डाव्या कोपऱ्यात दिला आहे. हा एक सिंगल सेंसर कॅमेरा आहे. मागे एलईडी फ्लॅशसोबत ड्यूएल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. रियरमध्येच फिंगरप्रिंट स्कॅनरही आहे. फिंगरप्रिंट स्कॅनरच्या चारही बाजुंना एक गोल नोटिफिकेशन लाइटही आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2obVrJh
Comments
Post a Comment