रिलायन्स जिओ फायबरची खास ऑफर; तीन महिने फ्री

नवी दिल्लीः लाँच होऊन एक महिन्याहून अधिक काळ झाला आहे. जिओ गीगा फायबरबरोबर कंपनीनं हाय स्पीड इंटरनेटसोबत अॅडव्हान्स सर्व्हिस दिली आहे. या सणासुदीच्या काळात रिलायन्सनं ग्राहकांना खुष करण्यासाठी खास ऑफर देऊ केली आहे. ग्राहकांना पुन्हा एकदा रिलायन्स तीन महिन्यांसाठी प्रिव्ह्यू ऑफरचा लाभ घेण्याची संधी आहे. कंपनीनं पुन्हा एकदा प्रिव्ह्यू ऑफर सुरू केली आहे. प्रिव्ह्यू ऑफरचे फायदे जिओ फायबर लाँच होण्यापूर्वी कंपनी त्याची चाचणी घेत होती. त्यादरम्यान काही निवडक ग्राहकांना फायबर कनेक्शन प्रिव्ह्यू ऑफरमध्ये देण्यात आले होते. यात ग्राहकांना २,५०० रिफंडेबल डिपॉजिट तसंच इन्स्टोलेशन फ्री होते. प्रीव्ह्यू ऑफरमध्ये कंपनी ४० जीबी बोनस डेटासुद्धा देण्यात येत आहे. या बोनस डेटाचा उपयोग तुमचा इंटरनेट डेटा संपल्यानंतरच वापर करण्यात येऊ शकतो. युजर्सना १०० जीबी डेटा मिळतोय. त्याचबरोबर जिओ अॅप्सचं सबस्क्रिप्शनचीसुद्धा ऑफर मिळणार आहे. प्रिव्ह्यू ऑफरच्या नवीन अपडेटनुसार, टेलिकॉम टॉकच्या एका अहवालानुसार काही ग्राहकांना कनेक्शन प्रिव्ह्यू ऑफरच्या अंतर्गत मिळणार आहे. या ऑफरमध्ये अधिक डेटा असलेले कूपन, फ्री इन्स्टोलेशन चार्जसारख्या अन्य ऑफर्स मिळणार आहेत. जियो गीगाफायबर कनेक्शन आणि सबस्क्रिप्शन कंपनीनं डिव्हाइसच्या चाचणी दरम्यान ४,५०० रुपये सिक्युरिटी डिपॉजिटसह उपलब्ध केलं होत. मात्र, कंपनीनं आता त्याची किमंत कमी करुन २, ५०० रुपये इतकी केली आहे. गिगाफायबरचं सबस्क्रिप्शनची सुरुवात ६०० रुपये प्रतिमहिना असेल. यात युजर्सना ५०mbps स्पीडबरोबरच १०० जीबी डेटा मिळेल. डेटा बेनिफिटबरोबरच या प्लॅनमध्ये लँडलाइनसाठी फ्री कॉलिंगची ऑफर दिली आहे. जिओ फायबर केबल टी.व्ही जिओ फायबर कनेक्शनबरोबर टी.व्ही सर्व्हिस घेण्यासाठी ग्राहकांना सबस्क्रिप्शन घ्यावे लागणार आहे. ही सर्व्हिस फक्त डीटीएचच्या माध्यमातूनच मिळणार आहे. केबल सर्व्हिससाठी जिओ मोफत सेट-टॉप बॉक्स देखील मिळणार आहे. या सेट-टॉप बॉक्समध्ये अनेक फिचर असून त्यात व्हिडिओ कॉलिंगसोबत मिक्स रिअॅलिटी सर्व्हिस मिळणार आहे. वेलकम ऑफर जिओ फायबरद्वारे लाँच होणारे सर्व वेलकम ऑफरमध्ये यामध्ये युजर्सना पाच हजार किमत असलेली जिओ होम गेटवे सेवासोबत ६,४०० रुपयांचा जिओ ४के सेट-टॉप बॉक्स मिळणार आहे. फ्री- व्हॉइस कॉल जिओ होम फोनमध्ये कंपनी ब्रॉडबँड कनेक्शनसोबतच लँडलाइन सेवा देण्यात येत आहे. या सेवेमुळं ग्राहक देशभरात फ्री व्हॉइस कॉल करू शकणार आहेत. तसंच कमी दरात आंतरराष्ट्रीय फोन करू शकणार आहेत.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2nra2QE

Comments

clue frame