इन्स्टाग्रामचं डार्क मोड फिचर आता आयफोनमध्ये

नवी दिल्लीः युजर्सना आता इन्स्टाग्रामसाठीही डार्क मोड फिचर वापरता येणार आहे. अँड्रोइड स्मार्टफोनसाठी आधीपासूनच इन्स्टाग्रामचं हे फिचर उपलब्ध होतं, त्यानंतर अलीकडेच आयफोनसाठी हे फिचर देण्यात आलं आहे. आयफोन युजर्स अॅपलमधील डार्क मोड फिचर सुरू करून इन्स्टाग्रामचा लूक बदलू शकणार आहेत. गेल्या वर्षभरापासून अॅपलसाठी या फिचरची चाचणी घेण्यात येत होती. अखेर हे आहेत नवीन फिचर इन्स्टाग्रामच्या नवीन फिचरच्या साहय्याने अॅपची बॅकग्राउंड पूर्ण ब्लॅक किंवा ग्रे करू शकता. तसंच, इन्स्टाग्राम युजर्सना डायरेक्ट मेसेज स्क्रीनसुद्धा ब्लॅक आणि ग्रे करता येणार आहे. अॅपच्या प्रोफाइल पेजच्या बॅकग्राउंडला डार्क ग्रे कलर करण्यात आला आहे. तर, एडिट प्रोफाइल, प्रमोशन या पर्यायांसाठी ब्लॅक रंग ठेवता येणार आहे. असा अॅक्टिवेट करा डार्क मोड आयफोनवर डार्क मोड अॅक्टिवेट करणं अगदीच सोप्प झालं आहे. या टीप्सच्या मदतीनं तुम्ही तुमचं इन्स्टाग्रामवर हे फिचर अॅड करू शकता. >> आयफोनमधील इन्स्टाग्राम अॅपचं लेटेस्ट व्हर्जन अपडेट करा >> आयफोनमधील सेटिंग्स सुरू करा >> त्यानंतर डिस्प्ले आणि ब्राइटनेच्या पर्याय निवडा >> हे पर्याय निवडल्यानंतर तिथं डार्क ऑप्शनवर निवडा


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2JdDe5d

Comments

clue frame