मुंबई: रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. ऐन सणासुदीत आपल्या ग्राहकांना आनंद मिळावा, यासाठी जिओ कंपनीनं ही ऑफर आणली आहे. या खास ऑफरमध्ये ग्राहकांना जिओ फोन फक्त ६९९ रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. हा फोन तुम्हाला तुमच्या नातेवाइक किंवा मित्रमंडळींना गिफ्ट करता येणार आहे. तुम्ही जर हा जिओ फोन इतरांना गिफ्ट करु इच्छित असाल तर तुम्हाला ८०८ रुपये मोजावे लागणार आहेत. फोन गिफ्ट करताना अधिकच्या ऑफर्सही मिळणार आहेत. या आहेत ऑफर्स या फेस्टिव्ह सिजनमध्ये जिओ फोनवर चार ऑफर्स उपलब्ध आहेत. ८०८ रुपये किंमतीचा फोन ६९९मध्ये मिळणार असून यासोबतच ग्राहकांना एका महिन्याचा रिचार्जही मिळणार आहे. तसच १००६ रुपयांच्या ऑफरमध्ये तीन महिन्यांचा रिचार्ज मोफत मिळणार आहे. १५०१ रुपयांमध्ये ८ महिन्यांचा रिचार्ज मोफत मिळणार आहे. १९९६ रुपयांमध्ये हा फोन खरेदी करत असाल तर १३ महिन्यांचा रिचार्ज मिळणार आहे. जिओ फोन गिफ्ट कसा करायचा?जिओ फोन गिफ्ट करण्यासाठी तीन पायऱ्या आहेत. - जिओच्या अधिकृत संकेस्थळावर जाऊन 'Gift ' ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर 'गिफ्ट नाउ' असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. - तुमच्यासोबतच तुम्हाला हा फोन ज्या व्यक्तीला गिफ्ट करायचा आहे. त्या व्यक्तीचा नंबरही टाका. - तुम्हाला हवा असलेला रिचार्जचा पर्याय निवडा. आणि ऑनलाइन पेमेंट करा. - तुम्ही पाठवेललं रिचार्ज वाउचर भारतात कोणत्याही जिओ स्टोरमध्ये रिडीम करता येईल. जिओ फोन २२ भारतीय भाषांना सपोर्ट करतो. यात गुगल असिस्टेंट सपोर्ट सुद्धा देण्यात आला आहे. हँडसेट आणि टीव्हीला एक केबल मधून कॉन्टेन्टला टीव्हीवर मिरर केले जाऊ शकते. जिओ फोनमध्ये जिओ सिनेमा, जिओ म्युझिक, जिओ टीव्ही आणि Xpress News यासारख्ये अॅप्स आधीपासूनच यात समाविष्ट करण्यात आले आहेत. दिवाळीनिमित्त अनेक मोबाइल कंपन्यांकडून दिवाळी ऑफर सुरू करण्यात आली आहे. स्मार्टफोनवर मोबाइल कंपन्यांनी घसघशीत कपात करण्यात आली आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/35Oeuds
Comments
Post a Comment