अर्ध्या तासात गॅलेक्सी फोल्ड 'आउट ऑफ स्टॉक'

नवी दिल्लीः स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने (Samsung) नुकताच लाँच केलेला () ला ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. फोल्डेबल असलेला स्मार्टफोन लोकांच्या खूप पसंतीस उतरला आहे. गॅलेक्सी फोल्डची प्री-बुकिंग अवघ्या ३० मिनिटात झाली आहे. या आधीही कंपनीने या फोनची प्री-बुकिंग केली होती. यावेळीही ३० मिनिटांच्या आत तब्बल १ हजार ६०० फोनची विक्री झाली होती. परंतु, आता गॅलेक्सी फोल्डची प्री-बुकिंग ऑफलाइन आणि ऑनलाइन स्टोरवर बंद करण्यात आली आहे. प्री-बुकिंग करण्यात आलेल्या ग्राहकांना २० ऑक्टोबरला फोन मिळणार आहे. या फोनची किंमत १ लाख ६४ हजार ९९९ रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. ४ ऑक्टोबरपासून या फोनची प्री-बुक करण्यात आली होती तर २० ऑक्टोबरला हा फोन ग्राहकांच्या हाती पडणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी फोल्डचे खास वैशिष्ट्ये काय आहेत. याची माहिती अद्याप समोर आली नाही. परंतु, या फोनमधील प्रोसेसर ७ एनएम प्रोसेसरचा तयार करण्यात आला आहे. तसेच यात क्वॉलकॉमचे स्नॅपड्रॅगन ८५५ चा प्रोसेसर असणार आहे. या फोनमध्ये ७.३ इंचाचा इनफिनिटी फ्लेक्स डायनेमिक एमोलेड प्रायमरी डिस्प्ले आहे. याचा रिझॉल्यूशन १५३६x२१५२ पिक्सल आहे. तर डिस्प्ले ४.६ इंचाचा सुपर एमोलेड डिस्प्ले आहे. याचा रिझॉल्यूशन ८४०x१९६० पिक्सल असणार आहे. या फोनमध्ये १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज असणार आहे. या फोनमध्ये दोन बॅटरी देण्यात आली असून त्याची ४३८० क्षमता आहे. या फोनमध्ये एकूण सहा कॅमेरे देण्यात आले आहे. मागे तीन, दोन आतमध्ये आणि एक फ्रंट कॅमेरा असणार आहे. फोनमध्ये रियर पॅनलवर १६ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल पहिला लेन्स, १२ मेगापिक्सल वाइड अँगलचा लेन्स आणि १२ मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स आहे. फ्रंट कॅमेऱ्यात १० मेगापिक्सल व ८ मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फीसाठी १० मेगापिक्सलचा आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2M9wwPm

Comments

clue frame