आता फेसबुकवर वाचा बातम्या; न्यूज टॅब फिचर लाँच

मुंबईः सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकवर आता बातम्यादेखील वाचता येणार आहेत. फेसबुकनं काही निवडक वृत्तपत्रांसोबत मिळून न्यूज टॅब हे नवीन फिचर लाँच केलं आहे. सध्या अमेरिकेत या फिचरची चाचणी घेण्यात येत असून २००,००० युजर्संना मर्यादित कालावधीपर्यंत वापरता येणार आहे. या फिचरमध्ये बातम्यांचे चार विभाग करण्यात आले आहेत. जनरल, टॉपिकल, डायवर्स आणि स्थानिक बातम्या या विभागात असणार आहेत. 'द वॉल स्ट्रीट' जनरलच्या अहवालानुसार, फेसबुकनं सुरूवातीला एबीसी न्यूज, एनबीसी न्यूज, फॉक्स न्यूज, द न्यू यॉर्क टाइम्स, द लॉस एंजलिस, ब्लूमर्ग मीडिया, आदी वृत्तपत्रांसोबत करार केला आहे. या सर्व वृत्तसंस्थांना मोबदलादेखील देणार आहे. तसंच, फेसबुक आणखी २००हून अधिक वृत्तपत्रांसोबत जोडण्याचा प्रयत्न करणार आहेत. वाचकांच्या आवडीनुसार बातम्या 'न्यूज टॅब'मध्ये युजर फ्रेंडली इंटरफेस असणार आहे. Today's stories या सेक्शनसाठी फेसबुकवर पत्रकारांची एक टीम दिवसभर महत्त्वाच्या घडामोडी वाचकांसाठी निवडणार आहे. तसंच, युजर्सना त्यांच्या पसंतीनुसार बातम्यांची निवड करता येणार आहे. यात मनोरंजन, बिझनेस, हेल्थ, तंत्रज्ञान आणि क्रिडा या विभागातील बातम्यासुद्धा वाचता येणार आहेत. अनेक पब्लिशर्स पेड सब्सक्रिप्शनसुद्धा युजर्सना देऊ शकतात. झुकेरबर्गनं केलं होतं आवाहन 'या फिचरमुळं सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फेक न्यूजला आळा बसेल. फेसबुकचं हे नवीन सेक्शन योग्य आणि अधिकृत बातम्या युजर्सपर्यंत पोहचवण्यासाठी मदत करेल.'असं फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्गनं सांगितलं आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2BMOTUk

Comments

clue frame