मुंबई: मायक्रोब्लॉगिंग सोशल मीडिया साइट ट्विटरनं यंदाच्या दिवाळीसाठी खास फेस्टिव्ह लॉन्च केला आहे. हा इमोजी विशेष असणार आहे असं ट्विटरकडून सांगण्यात आलं आहे. हा इमोजी हटके बनवण्यात आला असून ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीसपर्यंत हा इमोजी ट्विटरवर दिसेल. हा नवीन 'पणती' इमोजी अनेक ट्रिक वापरून तयार करण्यात आलाय. ट्विटरवर लॉन्च करण्यात आलेल्या या ' पणती' इमोजीचं वैशिष्ट्य म्हणजे हा डार्कमोड आणि लाइटमोडवर हा वेगवेगळ्या पद्धतीनं दिसणार आहे. लाइटमोडवर तुम्ही हा इमोजी पाहिलात तर, तुम्हाला एक छान पणती दिसेल. परंतू डार्कमोड ऑन केल्यानंतर पणतीच्या ज्योत आणखी मोठी आणि आणखी उजळताना दिसणार आहे. ट्विटरनं यापूर्वी देखीन अनेक सणांना इमोजी लॉन्च केले आहेत. परंतू यंदा लॉन्च करण्यात आलेला इमोजी हटके असल्यानं ट्विटवर त्याला चांगलीच पसंती मिळत आहे. लॉन्च करण्यात आलेला हा फेस्टिव्ह इमोजी २९ ऑक्टोबर पर्यंत दिसणार आहे. युजर्सना आकर्षित करण्यासाठी काही तरी वेगळं आणि खास करण्याचा आमचा विचार होता. त्यासाठी आम्ही 'लाइट्स ऑन' इमोजी घेऊन आलो असं ट्विटर इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर मनीष माहेश्वरी यांनी सांगितलं.
from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2pR1WS4
Comments
Post a Comment