'ओप्पो के५' लाँच. जाणून घ्या किंमत-फीचर्स

नवी दिल्लीः काही दिवसांपूर्वी लीक झालेला ओप्पोचा के५ (Oppo K5) हा आज गुरूवारी चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. चीनची स्मार्टफोन बनवणारी कंपनी ओप्पोने या स्मार्टफोनसोबत ओप्पो रेनो एस () लाही लाँच केले आहे. स्मार्टफोन कंपनीने काही महिन्यापूर्वी लाँच केलेल्या ओप्पो के३ या स्मार्टफोनचे अपग्रेड व्हर्जन आहे. या फोनचे वैशिष्ट्ये म्हणजे या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमध्ये पाठीमागे कंपनी क्वॉर्ड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे यात स्नॅपड्रॅगन ७३०जी एसओसी आणि ३० डब्ल्यू सुपर व्हीओओसी फास्ट चार्जचा सपोर्ट देण्यात आला आहे. ओप्पोने OPPO K5 स्मार्टफोनला तीन वेगवेगळ्या प्रकारात लाँच केले आहे. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १९ हजार रुपये आहे. तर ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २१ हजार रुपये आहे. ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २५ हजार रुपये इतकी आहे. कंपनीने हा फोन तीन रंगात म्हणजेच ग्रीनस ब्लू आणि व्हाइट कलरमध्ये उपलब्ध केले आहे. चीनमध्ये हा फोन १७ ऑक्टोबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. भारतात हा फोन कधी लाँच होईल, हे कंपनीने अद्याप स्पष्ट केलेले नाही. या फोनमध्ये ६.४ इंचाचा ओएलईडी स्क्रीन देण्यात आला आहे. यात सेल्फीसाठी वॉटरड्रॉप स्टाइल नॉच दिला आहे. डिस्प्लेचा रेग्युलेशन फुल एचडी आहे. यात इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. यात क्वाॉर्ड कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. फ्रंट कॅमेरा हा ६४ मेगापिक्सलचा आहे. हा कॅमेरा सॅमसंगचा जीडब्ल्यूवन ६४ कॅमेरा सेन्सर आहे. तर सेकंडरी कॅमेरा हा ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल आहे. तिसरा कॅमेरा २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. तर चौथा कॅमेरा सेन्सर मायक्रो फोटोग्राफीसाठी देण्यात आला आहे. फ्रंट कॅमेऱ्यात कंपनीने ३२ मेगापिक्सलचा सेन्सर दिला आहे. या आधुनिक फोनमध्ये ४,००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. यात ३० डब्ल्यू फास्ट चार्ज टेक्नोलॉजीचा सपोर्ट देण्यात आला आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2p5ORE6

Comments

clue frame