मोबाइलमध्ये आलाय 'हा' नवा व्हायरस; डिलिटही होत नाही!

नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांपासून शेकडो अँड्रॉइड यूजर एका नव्या मालवेअरमुळं त्रस्त आहेत. हा नवा एकदा डिलिट केल्यानंतरही फोनमध्ये पुन्हा इन्स्टॉल होत आहे. इतकंच नाही तर स्मार्टफोन फॅक्ट्री रिसेट केल्यानंतरही तो पुन्हा फोनमध्ये येत आहे. एक्सहेल्पर (Xhelper) नावाच्या या मालवेअरनं गेल्या सहा महिन्यांत ४५ हजारांहून अधिक अँड्रॉइड डिव्हाइसमध्ये शिरकाव केला आहे. त्यामुळं यूजर त्रस्त आहेत. हा नवा दिवसेंदिवस अधिकच पसरत आहे. 'सिमॅन्टेक'च्या ताज्या रिपोर्टनुसार, एक्सहेल्पर दिवसाला जवळपास १३१ आणि दर महिन्याला सरासरी २४०० अँड्रॉइड डिव्हाइसमध्ये शिरकाव करत आहे. या नव्या व्हायरसमुळं सर्वाधिक भारत, अमेरिका, रशियामधील यूजर त्रस्त आहेत. थर्ड पार्टी अॅपच्या माध्यमातून शिरकाव मालवेअर बाइट्सच्या रिपोर्टनुसार, वेब रिडायरेक्ट हा या मालवेअरचा स्त्रोत आहे. अँड्रॉइड अॅप होस्ट करणाऱ्या वेब पेजवर यूजरना वेब रिडायरेक्टच्या माध्यमातून पाठवलं जातं. प्ले स्टोरच्या बाहेर अनऑफिशियल अँड्रॉइड अॅप्सना कशा प्रकारे साइड लोड करता येईल हे यूजरना या वेबसाइट्सच्या माध्यमातून सांगितलं जातं. या अनऑफिशियल अॅप्समध्ये दडून बसलेला कोड एक्सहेल्पर ट्रोझन डाउनलोड करतो. पैसा कमावण्याचं माध्यम रिपोर्ट्सनुसार, हे ट्रोझन यूजरची मोठी हानी करत नाही ही एक दिलासा देणारी बाब आहे. मालवेअरबाइट्स आणि सिमॅन्टेकनुसार, या ट्रोझननं आतापर्यंत बहुतांश पॉपअप जाहिराती आणि नोटिफिकेशन स्पॅम दाखवले आहेत. या जाहिराती आणि नोटिफिकेशन यूजरना प्ले स्टोरवर रिडायरेक्ट करतात. तेथे त्यांना अन्य अॅप इन्स्टॉल करण्यासाठी सांगितले जाते. याचाच अर्थ एक्सहेल्परचे मेंबर 'पे-पर-इन्स्टॉल' कमिशन अर्थात अॅप इन्स्टॉल केल्यास मिळणाऱ्या कमिशनच्या माध्यमातून पैसा कमावतात, असं मानलं जातं. एक्सहेल्पर हे अन्य अँड्रॉइड मालवेअरसारखं काम करत नाही. सर्वप्रथम हे ट्रोझन एका अॅपच्या माध्यमातून अँड्रॉइड डिव्हाइसमध्ये अॅक्सेस मिळवतो. त्यानंतर एक्सहेल्पर त्या डिव्हाइसमध्ये स्वतंत्र अशा पद्धतीनं इन्स्टॉल होतं. ज्या अॅपच्या माध्यमातून ते डिव्हाइसमध्ये आलंय ते अनइन्स्टॉल केल्यानंतरही एक्सहेल्पर डिव्हाइसमधून रिमूव्ह होत नाही. डिव्हाइसमध्ये राहून ते पॉपअप आणि नोटिफिकेशन स्पॅम दाखवतं. फॅक्ट्री रिसेट करूनही रिमूव्ह होत नाही अँड्रॉइड डिव्हाइसच्या अॅप सेक्शनमधून एक्सहेल्पर अनइन्स्टॉल केलं तरी प्रत्येकवेळा ते पुन्हा इन्स्टॉल होतं. डिव्हाइस फॅक्ट्री रिसेट केल्यानंतरही ते पुन्हा इन्स्टॉल होतं. गेल्या काही महिन्यांपासून अनेक यूजरनं एक्सहेल्पर अनइन्स्टॉन होत नसल्याच्या तक्रारी रेड्डिट, गुगल प्ले हेल्प आणि अन्य हेल्पलाइन व्यासपीठांवर केल्या आहेत.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/34d3zIz

Comments

clue frame