नवी दिल्लीः शाओमी कंपनीचा () या स्मार्टफोनला काही महिन्यापूर्वी भारतात लाँच करण्यात आले होते. आयडीसीच्या रिपोर्टनुसार, रेडमी नोट ७ प्रो हा फोन २०१९ मध्ये सर्वात जास्त विकला जाणारा स्मार्टफोन आहे. यावरून हा फोन किती लोकप्रिय आहे, याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. आता या फोनच्या किंमतीत भारतीय बाजारात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे हा फोन ऑनलाइन २ हजारांनी स्वस्तात मिळणार आहे. फ्लिपकार्ट या ई - कॉमर्स साईटवर हा फोन केवळ ११ हजार ९९९ रुपयांना खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. तसेच या फोनवर एक वर्षाची ब्रँड वॉरंटी दिली जात आहे. ई-कॉमर्स साईट फ्लिपकार्टवर सध्या रेडमी नोट ७ प्रो च्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ११ हजार ९९९ रुपये करण्यात आली आहे. ज्यावेळी हा फोन भारतात लाँच करण्यात आला होता त्यावेळी या फोनची किंमत १३ हजार ९९९ रुपये इतकी होती. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजच्या स्मार्टफोनची किंमत लाँच करण्यात आली होता त्यावेळी १६ हजार ९९९ रुपये होती. हा फोन आता दोन हजारांनी स्वस्त म्हणजेच १४ हजार ९९९ रुपयांत मिळणार आहे. तसेच रेडमीच्या खरेदीवर फ्लिपकार्ट १ हजारांचा अतिरिक्त डिस्काउंट देत आहे. जर ग्राहकांनी सीटी बँक किंवा डेबिट कार्डने पेमेंट दिल्यास या ग्राहकांना आणखी १० टक्के डिस्काउंट दिला जाणार आहे. रेडमी नोट ७ प्रो चे वैशिष्ट्ये म्हणजे यातील कॅमेरा होय. या फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेट अप देण्यात आला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. सोनी आयएमएक्स ५८६ सेन्सर आणि ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर असल्याने फोटो चांगले येतात. या फोनमध्ये ईआयएस, सुपर नाइट सीन मोड, एचडीआर आणि पीडीएएफचा समावेश आहे. या फोनमध्ये क्वालक्वॉम स्नॅपड्रॅगन ६७५ ऑक्टा-कोर चिपसेटवर काम करते. यात देण्यात आलेले स्टोरेजची क्षमता मायक्रोएसडी कार्डच्या साहायाने २५६ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. फोनमध्ये ६.३ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिझॉल्यूशन १०८०x२३४० पिक्सल आहे. पॉवर बॅकसाठी ४ हजार एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Mm3xa3
Comments
Post a Comment