मुंबई: सॅमसंगचा फोन खरेदी करायचा असेल तर एक चांगली बातमी आहे. Galaxy A80ची किंमत तब्बल ८,००० हजारांनी कमी झाली आहे. लॉन्च झाला तेव्हा या फोनची किंमत तब्बल ४७,९९० रुपये इतकी होती. किंमत कमी झाल्यानंतर हा फोन आता ३९,९०० रुपयांना खरेदी करता येणार आहे. कंपनीनं हा फोन जूलै महिन्यात लॉन्च केला होता. रोटेटींग कॅमेरा हे या फोनचं वैशिष्ट्य आहे. फोनचा कॅमेरा मॉड्यूल रियर पॅनल देण्यात आला आहे. रोटेटींग कॅमेरा असल्यानं हा सेल्फी कॅमेरा म्हणूनही वापरता येतो. हा फोन 'गॅलेक्सी ए' या सिरीज अंतर्गत लॉन्च करण्यात आलेला लेटेस्ट फोन आहे . कमी झालेल्या किंमतीसह हा फोन शॉपिंग वेबसाइट अॅमेझॉनवरही उपलब्ध आहे. तसंच समसंगच्या अधिकृत वेबसाइटवरही हा फोन खरेदी करता येणार आहे. Galaxy A80 ची वैशिष्ट्ये >> ६.७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले >> १०८० X २४०० रिझॉल्यूशन पिक्सल >> ८ जीबी रॅम, १२८ जीबी स्टोरेज >> ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा >> ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा >> सेल्फीसाठी अल्ट्रा ३डी कॅमेरा >> ४जी व्हीओएलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ >> ३७०० क्षमतेची बॅटरी हा फोन तीन रंगात अँजल गोल्ड, फँटम ब्लॅक आणि घोस्ट व्हाइटमध्ये उपलब्ध आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2JdQ4Aw
Comments
Post a Comment