आमच्या छायाचित्रांद्वारे विक्रम लँडरचा शोध लागलेला नाही: नासाचा मोठा खुलासा

नवी दिल्ली: भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम असलेल्या 'चांद्रयान-२' च्या विक्रम लँडरबाबत '' या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने मोठा खुलासा केला आहे. ऑर्बिटरद्वारे मिळालेल्या ताज्या छायाचित्रांमध्ये 'चांद्रयान-२'च्या लँडरचा पत्ता लागलेला नाही, असे नासाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. ज्या वेळी आमचा ऑर्बिटरने छायाचित्रे घेतली, त्या वेळी एखाद्या गडद सावलीत लपला असावा असे नासाने म्हटले आहे. चंद्रावर उतरते वेळी चा इस्रोशी संपर्क तुटला होता. नासाच्या ऑर्बिटरने १४ ऑक्टोबरला विक्रम लँडर जेथे उतरले होते त्या जागेची छायाचित्रे टिपली होती, मात्र त्या फोटोंमध्ये विक्रम लँडरचे अस्तित्व दिसत नाही, असे नासाचे प्रकल्प शास्त्रज्ञ नोह एडवर्ड यांनी स्पष्ट केले. या पूर्वीही विक्रम लँडरबाबत नासाने मोठा खुलासा केला होता. चांद्रयान-२ च्या विकम लँडर जेथे उतरले ती जागा शोधण्याचे काम अजून बाकी आहे, असे नासाने म्हटले होते. विक्रम लँडर हे चंद्रावर जवळजवळ आदळले आहे असे नासाने काही दिवसांपूर्वी म्हटले होते. मात्र, ती नेमकी जागा शोधण्याचे काम होणार असल्याचे नासाने म्हटले आहे. नासाच्या ऑर्बिटरने जेव्हा छायाचित्रे घेतली, त्या वेळी तेथील वातावरण अतिशय धुरकट होते. यामुळे नासा त्या भागात स्वच्छ प्रकाश येण्याची वाट पाहणार असून, त्यानंतर पुन्हा प्रयत्न केले जातील, असे नासाने म्हटले होते. ऑक्टोबर महिन्यात चंद्रावर स्वच्छ प्रकाश येईल, त्यानंतर पुन्हा त्या जागेचे फोटो घेतले जातील असे नासाने म्हटले होते. वाचा- नासाच्या म्हणण्यानुसार, विक्रमने चंद्राच्या दक्षिणी ध्रुवावर सिम्पीलियस एन आणि मेनजनीस सी केट्रर्स यांच्या मध्ये उतरण्याचा प्रयत्न केला होता. चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा भारताचा हा पहिलाच प्रयत्न होता. विक्रम लँडरचे हे लक्षित उतरण्याचे ठिकाण दक्षिणी ध्रुवापासून सुमारे ६०० किलोमीटरच्या अंतरावर होते असे नासाने म्हटले होते. ही जागा शोधण्यासाठी नासाने एक छोटासा प्रयत्न केला होता. लूनर रिकॉनसिंयांस ऑर्बिटर या एलआरओ (नासाचे रोबोट अंतरिक्ष यान) १७ सप्टेंबर या दिवशी या लँडिग स्थळावरून जात असतानाच त्याने या जागेची काही हाय रेझॉल्यूशन छायाचित्रे घेतली. मात्र असे असले तरी आतापर्यंत विक्रम लँडरचा शोध लागलेला नाही. या महिन्यात नासा पुन्हा करणार प्रयत्न ऑक्टोबर महिन्यात एलआरओ पुन्हा एकदा विक्रम लँडर उतरले त्या जागेवरून जाणार आहे. या वेळी स्वच्छ प्रकाश असेल अशी नासाला अपेक्षा आहे. याचा फायदा घेत नासाचे ऑर्बिटर पुन्हा या जागेची छायाचित्रे घेणार आहे.


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2pIeU4w

Comments

clue frame