गुगलनं आणला पेपर फोन; मोबाइलचं व्यसन सोडवणार

नवी दिल्ली: स्मार्टफोन हा सध्या माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला असून अनेकांना त्याचं व्यसनच जडलं आहे. स्मार्टफोनच्या अतिवापराचा परिणाम इतर गोष्टींवरही होऊ लागला आहे. या समस्येवर गुगलनं एक अनोखं उत्तर शोधलं आहे. स्मार्टफोनचं व्यसन सोडवण्यासाठी गुगलनं आणला आहे. गुगलनं आपल्या ब्लॉगवर याबाबतची माहिती दिली आहे. त्यानुसार, पेपर फोन हा प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेला ओपन सोर्स अॅप आहे. या अॅपचा वापर कुठेही केला जाऊ शकतो. हा अॅप स्मार्टफोनचं व्यसन सोडवण्यासाठी मदत करतो. मायक्रोसॉफ्टची सहयोगी कंपनी व जगातील सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या Github (गिटहब) वर या अॅपचा कोड उपलब्ध आहे. कसा चालतो पेपर फोन? पेपर फोन अॅपमध्ये आपल्याला संपर्क क्रमांक, मॅपसारख्या आवश्यक गोष्टी समाविष्ट करता येतात. यापैकी ज्या कुठल्या गोष्टीचा वापर आपल्याला करायचा आहे, त्या गोष्टीची प्रिंट पेपर फोन अॅप काढतो. पेपर फोनचा मुख्य हेतू लोकांना स्मार्टफोनपासून दूर ठेवणे हा आहे. हा अॅप युजर्सना जास्तीत जास्त कामे पेपरच्या माध्यमातून करण्यासाठी प्रवृत्त करतो. डिजिटल जगापासून ब्रेक गुगलच्या म्हणण्यानुसार, स्मार्टफोनवर आपला खूपच वेळ जातोय. तंत्रज्ञान वापराचा समतोल आपल्याला राखता येत नाहीए, याची जाणीव अनेकांना असते. मात्र, हा समतोल कसा राखायचा याचं उत्तर त्यांच्याकडं नसतं. पेपर फोन अॅप हे त्यावरील उत्तर आहे. पेपर फोन आपल्या गरजेनुसार पर्सनल बुकलेट प्रिंट करून देतो. त्यामुळं आपल्याला डिजिटल जगापासून लांब राहता येतं. हा छोटासा प्रयोग लोकांना तंत्रज्ञानापासून दूर ठेवण्यास मदत करेल, असा विश्वास गुगलनं व्यक्त केला आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31TRqHb

Comments

clue frame