मुंबई: बाजारातील इतर कंपन्यांपेक्षा स्वस्त प्लॅन देऊन टेलिकॉम क्षेत्रात धक्के देणाऱ्या रिलायन्स जिओने आता हळूहळू एकेक धक्का द्यायला सुरुवात केली आहे. ऑउटगोइंग कॉलवर शुल्क लावल्यानंतर आता जिओनं आपल्या प्रीपेड रिचार्ज प्लानवर मिळणारं फुल टॉक टाइम बेनिफिटह बंद केलं. आणि आता कमी किंमतीचे प्लॅनही बंद केल्याचं समोर येत आहे. जिओच्या टॅरिफ प्लॅनची किंमत आता किमान ९८ रुपये इतकी झाली आहे. जिओनं त्यांचे १९ आणि ५२ रुपयांचे स्वस्त प्लॅन बंद केले. १९ रुपयांच्या रिचार्ज केल्यानंतर ग्राहकांना एक दिवसाची व्हॅलिडिटी मिळत असे. तर, ५२च्या प्लॅनमध्ये ५ दिवसांची मर्यादा असायची. ट्रायने आययूसी जारी केल्यानंतर कंपनीकडून हे स्वस्त प्लॅन बंद करण्याचा निर्णय घेतला. आययूसी एक मोबाइल टेलिकॉम ऑपरेटर आहे. जे दुसऱ्याला दिली जाणारी रक्कम आहे. ज्यावेळी एक टेलिकॉम ऑपरेटरचे ग्राहक दुसऱ्या ऑपरेटरच्या ग्राहकांना आउटगोइंग कॉल करतात. त्यावेळी आययूसीची रक्कम कॉल करणाऱ्या ऑपरेटरला द्यावी लागते. दोन वेगवेगळ्या नेटवर्क दरम्यान कॉल मोबाइल ऑफ-नेट कॉलच्या रुपात ओळखली जाते. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) कडून यासंबंधीचे शुल्क ठरवले जातात. सध्या याचे दर ६ पैसे प्रति मिनिट इतके आहे. ९८ रुपयांचा सर्वात स्वस्त प्लॅन१९ आणि ५२ रुपयांचे स्वस्त प्लॅन बंद केल्यानंतर जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन हा ९८ रुपयांना असणार आहे. यात २८ दिवसांची व्हॅलिडिटी मिळणार आहे. दररोज २ जीबी इंटरनेट डेटा तसंच जिओ टू जिओ अनलिमिटेड कॉल करण्याची सुविधा आहे तर, इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी ग्राहकांना टॉप-अप करावा लागणार आहे. एअरटेल आणि वोडाफोन स्वस्तजिओनं दर वाढवले असल्यानं या संधीचा फायदा घेत एअरटेल आणि वोडाफोन सारख्या कंपन्यांनी त्यांच्या प्लॅनच्या किंमती कमी केल्या आहेत. एअरटेल आणि वोडाफोनचा सर्वात स्वस्त प्लॅन हा ३५ रुपयांचा आहे. यात २८ दिवसांची व्हॅलिडिटी मिळत आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2W6AVGu
Comments
Post a Comment